ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये बाजार उपक्रम साजरा.

HomeNewsनागपुर डिवीजन

ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये बाजार उपक्रम साजरा.

– चिमुकल्यांनी जाणून घेतली बाजारसह व्यावहारिक माहिती.
– फळ – भाजीपाल्याने भरला बाजार.
गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा) – 30 नोव्हेंबर ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल राजुरा ही शाळा राजुरा  शहरात विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण व मार्गदर्शन करण्यास नावाजलेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले फळ भाज्या किती महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना व्यवहार ज्ञान देणे यासाठी  फ्रुट आणि व्हेजिटेबल डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    कार्यक्रमाला उपस्थित पालक वर्गाने त्यांचे शाळेविषयीचे मनोगत सादर केले आणि शाळा ही कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा राखण्याचे काम करते याविषयी मनोगत मांडले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सिंगापूर प्याटर्न वर आधारित शिक्षण या शाळेतून दिले जाते. प्ले स्कुल ते इयत्ता पहिली पर्यंतचे वर्ग या शाळेत असून अगदी लहान मुलं अभ्यासा व्यतिरिक्त रंग, आकार, दिवस, वार, महिने तसेच प्रत्येक संस्कृतीवरील विविध सणसमारंभ प्रत्यक्षपणे उपक्रमाच्या माध्यमातून राबवून त्याविषयीची माहिती अनुभवतात. बालवयातच हसतखेळत व विविध उपक्रमांच्या साह्याने कृतीयुक्त शिक्षण देणारी ही शाळा अल्पावधीतच नावारुपास आली आहे. याकरिता या शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि जयश्री मालेकर तसेच केंद्र संचालक ऍड . मनोज काकडे व ब्रँच इंचार्ज शुभांगी धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती सिंग आयेशा कुरेशी,  फिजा शेख यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेण्यात येतात. याकरिता ममता व अर्चना या मदतनीस चे सहकार्य लाभले. या कार्यक्रमांमध्ये पालकांनी शाळेमध्ये विविध उपक्रमातून मुलांना शिक्षण दिल्या जाते याबाबत कौतुक केले.

COMMENTS