भुषण मधुकराव फुसे यांचा राजुरा विधानसभा निवडणुक 2024 करीता उमेदवारी अर्ज/ नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहे.

HomeNewsनागपुर डिवीजन

भुषण मधुकराव फुसे यांचा राजुरा विधानसभा निवडणुक 2024 करीता उमेदवारी अर्ज/ नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहे.

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी गडचांदूर) – नेहमी फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीत सक्रिय असणारे तसेच सतत वंचितांच्या प्रश्नांसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते “भूषण मधुकरराव फुसे” यांनी 28 ऑक्टोबर रोजी गडचांदूर येथील हॉटेल हिलटॉप येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात मराठा सेवासंघ प्रणित ‘संभाजी ब्रिगेड’ मध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीप चौधरी तर मार्गदर्शक म्हणून मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवश्री हरिश्चंद्र थिपे यांची उपस्थिती होती. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करणात आली.संभाजी ब्रिगेडतर्फे पुष्पगुच्छ देऊन भूषण फुसे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी लगेच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भूषण फुसे यांची घोषणा केली.29 ऑक्टोबर रोजी भव्य रॅलीद्वारे भूषण फुसे आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे. कार्यक्रमाचे संचालन शिवश्री संतोश टोंगे सर,प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे सचिव शिवश्री सुधाकर तूरानकर यांनी तर संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष शिवश्री संतोष निखाडे उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी आभार व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडचे कोरपना तालुकाध्यक्ष शिवश्री प्रेमानंद डाहूले,शिवश्री पुसफुरे सर,शिवश्री दीलीप गोखरे सर,शिवश्री अशोक घुंगरुड सर, नांदा शहराध्यक्ष शिवश्री अविनाश काटे, गडचांदूर शहराध्यक्ष प्राचार्य गिरिधर बोबडे, राजुरा विधानसभा अध्यक्ष शिवश्री बाळा बोढे यांच्यासह पत्रकार बंधू व संभाजी ब्रिगेडच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह परिसरातील संभाजी ब्रिगेडचे मर्द मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS