गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – साकोली तालुक्यातील मौजा शंकरपुर येथे ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचिप्त साधून तथागत गौतम बुध्द व बोधिसत्व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण सोहळा कार्यक्रम आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 ला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .यावेळी अनावरण प्रसंगी एस बी भेंडारकर स्विय सहाय्यक (आमदार नाना पटोले यांचे), डाँ.सुरेशकुमार पंधरे संस्थापक बि. एम. आर .एफ ट्राईबल राईट्स फेडरेशन, मूर्ती दाना दाते इंजिनिअर इ कैलास रहांगडाले, प्रमुख अतिथी सुशिल गणवीर, गिरिधारी रहांगडाले, सरपंच माधुरी गहाने, मानिकराम टेकाम, उमराव मडावी, यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचशिल बौध्द विहार समिती शंकरपुर येथे संपन्न झाला. त्याचप्रमाणे पुतळ्याचा विधीवत अनावरण प्रसंगी समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला. समाजप्रबोधनात डाँ. सुरेशकुमार पंधरे यांनी १५ मिनिटाच्या भाषणात बौध्द व धम्म त्तव व सत्व जीवन जगण्याचा मंत्र विश्व रत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मपरिवर्तन करून जगाला साक्षात्कार करून दिला असा प्रयोग हिंदू धर्माचा त्याग करून दिक्षा भुमि नागपुर, मुंबई व येथून 14 आँक्टोबर 1956 ला जगाला दिक्षेतून दिला.
आज तारीख धम्मउपासक व उपासिका यांनी त्यांचे ज्ञान व शिक्षणाचा प्रमाण आपल्या घरात आलमारीत एक संविधान व पुस्तकासह संत महात्मे व विध्दवान यांचे ज्वलंत व पुस्तकांचे विचार वाचून उराशी बाळगा. संविधानातील अधिकाऱ व हक्काची सनद वाचा. वाचाल, तर खरच नाचाल. मनूवाद्यांची भडकलेल्या रंगीन दुनियेतील डोक्याच्या व्यवस्थेला तिलांजली देत माई, जिजाऊ, अहिल्या होळकर, सावित्री फुले, राणी दुर्गावती,माई रमाईचे संस्कार व बिरसाचा जल जमिन जंगलाचा लढा हा इग्रजी हुकमती विरूध्द होता तो समाज बांधवाने आपल्या जीवनात अंगिकारा तरच भविष्यात वंचित व प्रवाहा बाहेरिल एससी, एसटी ओबीसींना गुलामीत जीवन जगण्याची पाळी येणार नाही. व विकास सुध्दा साधताना जेष्ठांचे विचार आत्मसात करून सरकारी योजना जनतेला द्याव्यात असे कनखर प्रतिपादन मार्गदर्शन करताना केले. कार्यक्रमाचे संचालन जि .जे .रहांगडाले, विलास साखरे, तर प्रास्ताविक दिलिप राऊत यांनी केले आभार डि जी पुसाम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गावातील उपासक-उपासिका यांनी सहकार्य केले.
COMMENTS