गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – मी मतदार आहे, तेव्हा मतदान करून योग्य उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ते माझे राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारी आहे. तरच मतदानाची टक्केवारी वाढू शकेल. तेव्हा मतदाराने निर्भयपणे मतदान करण्याचा निश्चय करावा. त्याच प्रमाणे इतरांना सुद्धा आपल्या देशातील लोकशाही बळकट करण्यासठी १०० टक्के मतदान करावे असे आवाहन शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर चे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रकाश साठवणे, विस्तार अधिकारी पुष्पतोडे, रामरतन भाजीपाले उपस्थितीत होते. रॅलीतून मतदारांना आवाहन करतांना प्राचार्य राहुल डोंगरे म्हणाले की,१८ वर्षांवरील मतदार झालेल्या किंवा परिसरातील नागरिकांना मतदान करण्याकरिता जागृत करावे. त्याचबरोबर मतदान करतांना मतदार ओळखपत्र न विसरता घेवून जावे. जर मतदान ओळखपत्र नसेल तरी मतदार मतदान करू शकतात. त्यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, फोटो असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकाचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र असल्यास मतदान करू शकतात.महत्वाची बाब म्हणजे त्यांचे नाव मतदान यादीत असायला हवे. शासन – प्रशासनातील प्रत्येक व्यक्तीने भारतीय निवडणूक आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. स्वीप कार्यक्रमा अंतर्गत मा.दर्शन निकाळजे उपविभागीय अधिकारी, मा. मोहन टिकले तहसिलदार यांचे विशेष मार्गदर्शनातून मतदार जागृती रॅलीने तुमसरकरांचे लक्ष वेधून घेतले. ज्योती बावनकर, दिपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, नीतुवर्षा मुकुर्ने, रुपराम हरडे, विद्या मस्के, प्रिती भोयर, सीमा मेश्राम, अशोक खंगार, अंकलेष तिजारे, सुकांक्षा भुरे, बेनिता रंगारी, आरती पोटभरे, दिपक बालपांडे, नारायण मोहनकर, पुनम बालपांडे, अतुल भीवगडे, झांकेश्वरी सोनेवाणे, उषा दाते, कल्पना मानकर,बंदिनी खैरकर,विद्या देशमुख आदींनी विशेष सहकार्य केले.
COMMENTS