जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणासाठी सुरक्षित सिड बॉल्स निर्मिती कार्यक्रम संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणासाठी सुरक्षित सिड बॉल्स निर्मिती कार्यक्रम संपन्न.

– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, आदर्श शाळेतील राष्ट्रिय हरीत सेना, सामाजिक वनीकरण विभागाचा सिड बॉल्स निर्मिती उपक्रम.

गौतम नगरी चौफेर राजुरा – ५ जुन जागतीक पर्यावरण दिनानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रिय हरीत सेना, इको क्लब, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणासाठी सुरक्षित सिड बॉल्स निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नेफडो संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रिय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले, नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा सूनैना तांबेकर, ऍड. मेघा धोटे, राजुरा तालुका संघटक मिलींद गड्डमवार, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मोहनदास मेश्राम, उपाध्यक्ष नरेंद्र देशकर, सचिव रूपेश चीडे, युवा उपाध्यक्ष रवी बुटले, सुवर्णा बेले, बाल संघटीका दूर्वा बेले, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , सामाजिक वनीकरण चे किशोर कडूकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सिड बॉल्स हे बियाणे, सेंद्रिय कंपोस्ट खत, माती , पाणी आणि ईतर नैसर्गिक घटकांच्या मिश्रणाचे गोळे असतात जे झाडे लावण्याचे एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. सिड बॉल्स नैसर्गिकरीत्या तयार केलेले असतात त्यामुळें ते पर्यावरणासाठी सुरक्षीत असतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे असल्याने विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांना मदत होते. सावलीत गोळे सुकण्यास ठेवले आणि पावसाळा लागल्यावर हे सिड बॉल्स कठीण आणि खराब जमिनीवरही प्रभावीपणे कामं करतात, जिथे पारंपारिक पद्धतीने झाडे लावणे कठिण असते अश्या व रिकाम्या जागांवर हे सीड बॉल्स टाकले जाणारं आहेत. जवळपास तिन हजार आठशे वीस सिड बॉल्स तयार करण्यात आले. यात चिंचोके, निमोण्या, टेंभुर्णी, रिठा, चिकू, सीताफळ, आंबा, बोरं , करंज, विलायची चिंच अश्या विवीध प्रकारच्या बियांचा समावेश करण्यात आला. यावेळी आदर्श शाळेतील राष्ट्रिय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. सिड बॉल्स द्वारे  आदर्श ईको क्लब व लोगो आणि नेफडो असे शब्द लेखन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
———————————————

जागतीक पर्यावरण दिन एक लोकजागृती चळवळ बनली.- बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,
              नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मधे जागतीक पर्यावरण दिनानिमित्ताने विविध पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, प्लास्टिक बंदी, कापडी पिशवीचां वापर, सीड बॉल्स निर्मिती, स्वच्छतता अभियान, वृक्ष दिंडी, रांगोळी स्पर्धा असे विवीध उपक्रम राबविण्यात आल्याने जागतिक पर्यावरण दिन ही लोकजागृती चळवळ झाल्याचे मत बादल बेले यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दिपक भवर, महासचिव आशिया रिजवी तसेच राज्य, विभाग, जिल्हा ते तालुका पातळीवर सहकार्य मार्गदर्शन लाभले.

COMMENTS

You cannot copy content of this page