दिवाळी व मंडई च्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन

HomeNewsनागपुर डिवीजन

दिवाळी व मंडई च्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी भंडारा) – प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
    दरवर्षी दिवाळीपासून  गावोगावी मंडई चे आयोजन केले जाते व त्यामध्ये सर्व गावातील लोकांच्या मनोरंजन व्हावे व प्रबोधन व्हावे यासाठी रात्री विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये  संगीत नाटक, तमाशा, लावणी, दंडार, ऑर्केस्ट्रा असे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
   परंतु विधानसभा निवडणूक असल्याने आचार संहिता सुरू आहे अशामध्ये नाटकांना परवानगी देणे बंद असल्याने हजारो कलावंतांवर उपासमारीची वेड आली आहे.
      दिवाळी पासून चार महिने आम्ही सर्व कलावन्त कार्यक्रमाच्या भरवशावर वर्षभराचा नियोजन करीत असतो आणि नाटकाला, कव्वाली ऑर्केस्ट्रा लावणी  ला  परवानगी  मिळाली नाही तर बरेच कलावंतांवर हा अन्याय होईल. विधानसभा आचार संहिता निवडणूक सुरू असल्याने जे काही नियम असतील ते नियम लावून परवानगी देण्यात यावी यासाठी आज  जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनानिवेदन देण्यात आले. सोबतच लेखक संघटना वडसा यांच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात आले. यावेळी प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे  जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले, भंडारा तहसील उपाध्यक्ष सुरेंद्र उके, महासचिव सोमप्रभू तांदुळकर, संचालक कलाकार खोब्रागडे, अक्षय मेश्राम, ऑर्केस्ट्रा गायक अमर वैद्य, लेखक असोसिएशनचे  किशोर भाग्यवंत, आदेश खेडीकर, साऊंड सिस्टमचे शिवा मस्के, लावणी संघटना चे अध्यक्ष राजेश वासनिक उपस्थित होते.

COMMENTS