HomeNewsनागपुर डिवीजन

अवैध रेती माफिया मस्त; स्थानिक प्रशासन सुस्त;

लाखोचा महसूल सरकार चा चोरट्याच्या घरात

गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील इरई आणि सांगोडा नदी पात्रातून अवैध रेती उपसा राजरोपणे सुरू केली जात असून शासनाचा महसुली बुडत आहे तरी येथील महसूल प्रशासन सूस्त इरई आणि सांगोडा रेती माफिया मस्त गडचांदूर आणि कोरपना पोलीस ठाणे अंतर्गत या घाटातून रेतीच्या दिवसा आणि रात्री बिनधास्त तस्करीला केली जात आहे. अनेकदा ग्रामस्थांनी रेती बाबतीत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडे तक्रारीदरम्यान आळा घालण्यासाठी स्थानिक तहसील प्रशासन अपयशी ठरले आहे. दरम्यान रेती माफियाच्या विविध टोळ्या सक्रिय झाल्या असून कमी परिश्रमात जास्त कमाई करण्याच्या नांदात रेती माफिया उतरले आहेत. या परिसरात (गाडेगाव (विरूर) कोळसा खाण्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून हा गाडेगाव उठणार आसल्याने या गावात  यवतमाळ जिल्ह्यातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी हा गाडेगाव घर बांधनीसाठी पसंत केल्याचे बोले जात आहे )

गाडेगावात विरूर येथील सदर (नागरिकांनी) कोरपना तालुक्यातील आणि वणी तालुक्यातील ग्रामस्थांनी फक्त गाडेगाव हा घरबांधणीसाठी म्हणून पसंत केल्याने  या गाडेगावात जवळपास आज घडीला एकशे दहाच्या वर नवीन घर बांधकाम चालू आहेत (११०) या अनुषंगाने येथील रेती माफियांचा मोर्चा गाडेगावात दिवसभर आणि रात्री पण इरई आणि सांगोडा रेती घाटाचा लिलाव झाल्याचे दिसून येत नाही तरी  रोज  येवढी मोठी रेती येत कुठून असा अंदाज लावणे आजच्या घडीला बरे नाही,  येथील गाडेगावात पटवारी (आ , पिस ) असताना आणि या गाडेगावात रहिवासी तीन पोलीस पाटील (3) गडचांदूर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पाटील आहेत. एक ठाकरे तर दुसरा खामकर तर तिसरा मडावी याच गावात पक्के घरे बांधून या गावचे रहिवासी आहेत तरी येवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती पटवारीसह पोलीस पाटील यांच्या  डोळ्यासमोर रेती बेभावाणे विक्री होत आहे. या रेती विक्रीते येथील पोलीस पाटील किवा नागरिकांना घाबरत नाही यांचे कारण शोधून ही सापळत नसेल येथील रेती माफियांचे एकेरी दंडात्मक ..दंडेल असल्याने आणि पोलीस ठाणेसह तहसीलदार व संपूर्ण महसूल विभाग या रेती माफियांनी पैशाच्या मोहाच्या आधारावर खरेदी केल्याची चर्चा आणि रिपब्लिकनच्या महीला आघाडीच्या वतीने केला आहे. या घाटाचा मध्यंतरी पावसाळ्यात रेतीचा उपसा बंद होता. परंतु यांनी पावसाळ्यात आदीच रेती साठा मोठ्या प्रमाणात जागोजागी करून ठेवला होता, आता तर राजरोसपणे चालू आहे. इरई सह सांगोडा रेती घाटातून अवैध मार्गाने रेतीची लुटल्या जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी अनेक वेळा स्थानिक तहसील प्रशासना कडे  केल्या आहेत. तरी पण प्रशासन सुस्त असल्याचे चित्र दिसून यत आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page