गौतम नगरी चौफेर (बुलडाणा, (प्रतिनिधी)- अभी नही तो कभी नही हा नारा घेऊन महाबोधी महाविहार बोधगया मुक्तीच्या समर्थनार्थ नागपूर दिक्षाभुमी ते चैत्यभुमी पर्यंत पहिल्या टप्प्यात सुरू असलेली धम्मध्वज जनसंवाद यात्रेचे २२ ऑगस्ट रोजी बुलडाणा शहरात दुपारी १० वाजता आगमण झाले होते. प्रथम महाबोधी विहार धम्मगीरी येथे ध्वजाला व भंतेंना मानवंदना देण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील महाकारूणीक भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून धम्मध्वज यात्रेस शहरातून धम्माच्या व बोध्दगया मुक्तीच्या घोषणा देत संपूर्ण शहरातून धम्मध्वज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची जनसं बाद यात्रा गर्दै वाचनालयाच्या सभागृहात धम्मपीठावर भतेगण व हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाली बी.टी. अॅक्ट १९४९ निरस्त करण्यासाठी बोधगया महाबोधी महाविहार मुक्त अंदोलनाचे मुख्य संयोजक भंते विनाचार्य यांनी जनसंवाद यात्रेस संबोधित करतांना म्हणाले की, बौध्द समाजाची जी महाविहार मुक्तीची मागणी आहे. यामध्ये कोणतेही सरकार म्हणजे ते तेजस्वी यादव किंवा नितीश कुमार यांच्यापैकी कोणत्याही सरकारने ती पुर्ण केली पाहिजे. प्रत्येक पक्षाने आमच्या मागणीला सर्मथन दिले आहे. त्यामुळे बौध्द धर्म टिकला पाहिजे हे आमचे मुळ उदिष्ट आहे.
कुठल्याही धर्मस्थळावर प्रतिबंध लावला जावू शकतो. पण त्यावर कायदा करणे चुकीचे आहे, त्याला आमचा विरोध आहे. देशात आजपर्यंत कुठल्या मंदिर, मस्जिद किंवा चर्च वर कायदा बनलेला नाही. बिहार मधील महाबोधी महाविहार साठी कायदा बनविण्यात आला. हिंदू आणि बौध्द धर्मियांमध्ये लढाईचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. परंतू दोन्ही धर्मियांमध्ये सामाजिक सद्भाव अभेद्य असल्याने हे सर्व मनसुबे फलप होणार नाही. तसेच बिहार मधून महाबोधी महाविहाराची लढाई देशव्यापी जनआंदोलनात परिर्वतीत होणार असा विश्वास भंते विनाचार्य यांनी व्यक्त केला.
भंते विनाचार्य पूढे म्हणाले की, ही जनसंवाद यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी बुध्द धर्माची दिशा महाबोधी महयानार्थ जनसंवाद धम्म ध्याना घेतली त्या पवित्र नागभूमीतून निघाली आहे व तीचा बोधगया मुक्तीचा पहीला टप्पा २ स्पटेंबर २०२५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील चैत्यभूमी येथील अस्थीधातूला वंदन करून व महाबोधी विहार मुक्तीसाठी आंबेडकर अनुयायानी लाखोंच्या संख्येने एकजूट होऊन चैत्यभूमी येथे वावयाचे आहे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातूला स्मरून महाविहार मुक्तीची शपथ घेऊन दुसरुवा टप्प्याला सुरुवात करावयाची आहे तरी तमाम बुद्ध अनुयायांनी बौद्धधर्मीयांनी २ स्पटेंबर ला मुंबई येथील चैत्यभूमी वर महाविहार मुक्तीची शपथ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे कळकळीचे आव्हान भंते बिनाचार्य यांनी केले.
यावेळी भंते यश श्रीलंका यांनी हो धम्म व महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रेमचंद इंगळे, प्रस्ताविक मिलींद वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय वाकोडे यांनी केले यावेळी हाजारोच्या संख्येने बौध्द उपासक उपासिकांची उपस्थिती होती.


COMMENTS