गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या खिर्डी येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे मंगल आगमन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात झाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सपत्नीक, सहकुटुंब पुजाअर्चा करून लाडक्या बाप्पाची मनोभावे आराधना केली. धोटे कुटुंबियांसह गावातील नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावून पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचे स्वागत केले. भाविकांनी एकत्र येऊन पूजाअर्चा केली असता “गणपती बाप्पा मोरया” या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
गावकऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे खिर्डी गाव भक्ती, श्रद्धा आणि आनंदोत्सवाच्या रंगात रंगून गेले होते. या मंगलमय वातावरणात सर्वत्र बाप्पामय उत्सवाची चैतन्यदायी झलक अनुभवायला मिळाली.



COMMENTS