बाबासाहेब, रथ आणि शासनकर्ती जमात .

HomeNewsचंद्रपूर

बाबासाहेब, रथ आणि शासनकर्ती जमात .

गौतम नगरी चौफेर (इंजि,नागवंश नगराळे चंद्रपूर) – आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीवर एक दृष्टीक्षेप टाकल्यास आपण कुठे आहोत, काय कमावले, काय गमावले, प्राप्त परिस्थिती काय , भविष्यातील आव्हाने कोणती ? या बाबींचे एक चलचित्र समोर येईल . अर्थातच हे ज्याच्या त्याच्या दृष्टीवर , आकलनावर आणि अनुमानावर अवलंबून आहे . आतापर्यंतचा आंबेडकरी चळवळीचा प्रवास हा वेगवेगळ्या  एंगलनी बघितल्या जाऊ शकतो . परंतु सध्या बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशापैकी ” ……. कोणत्याही परिस्थितीत हा रथ मागे जाऊ देऊ नका ” आणि ” …. तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे “.या दोन मुद्द्यावर दृष्टीक्षेप टाकू .  पहिला संदेश हा खबरदारीचा आहे, सजगतेचा आहे , सुरक्षात्मकतेचा आहे तर दुसरा संदेश हा महत्वाकांशी आहे !
   या दोन्हीचा संबंध  जोडायचा झाल्यास दोन प्रकारे जोडता येईल , एक – शासनकर्ती जमात एकदाची नाही बनले तरी चालेल , परंतु रथ मात्र मागे जाऊ देऊ नका . दुसरे – रथाला पुढे नेत नेत शासनकर्ते बना . आता रथ कुठे आहे आणि शासनकर्ते झालो का ? या प्रश्नाची उतरे शोधल्यास आंबेडकरोत्तर ( बाबासाहेबानंतरच्या ) आंबेडकरी चळवळीचे मूल्यमापन करता येईल .
प्रायमाफेसीवरून या चळवळीच्या प्रवासाचे नकारात्मक मूल्यमापन होईल . परंतु हे मूल्यमापन उतावीळपणाचे , अदूरदृष्टीपणाचे होईल . व्यवहारिक आणि तटस्थ आकलन केल्यास आतापर्यंतचा प्रवास हा नकारात्मक नाही , हे लक्षात येईल . ज्यांना ही आंबेडकरी चळवळ गुंडाळून काँग्रेसवासी होण्याची घाई झाली असेल किंवा भाजपच्या भीतीने ग्रासले असेल ते ‘ छुटभय्ये ‘ नकारात्मक निष्कर्षावर येतील .
                बाबासाहेबांनी जो ‘ रथ ‘ म्हटला आहे , ते दुसरे तिसरे काही नसून मिळविलेले ‘ अधिकार ‘ आणि ते टिकविणारी चळवळ  होय . अनंत हालअपेष्टा सोसून हा रथ इथपर्यंत आणला . पोटची मुले आजाराने, औषधाअभावी, जन्मत्ता कुपोषणाने दगावली . पण समाजाच्या लाखो मुलांच्या भवितव्याची चिंता, त्यामुळे स्वतःच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही, शिष्यवृतीच्या मदतीने मिळणारे शिक्षण सोडले तर पुन्हा अशी संधी मिळणार नाही . उच्च शिक्षणाशिवाय सक्षम बननार कसे हा प्रश्न , म्हणून दिवसरात्र अभ्यास करून जगभरातले ज्ञान मिळविले, सर्व क्षेत्रातले ज्ञान मिळविले , अनेक भाषा अवगत केल्या , जगातील अनेक देशातील सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, अर्थ व्यवस्था , कायदे , इतिहास , संस्कृती इ. चा सखोल अभ्यास केला, प्राणाहून प्रिय रमाईला सोडून सातासमुद्रा पलीकडे राहावे लागले, स्वकियांचा विरह सोसावा लागला, मुलाच्या मृत्युची वार्ता ऐकून हंबरडा तिथेच पचवावा लागला. असह्य वेदना ह्या, कशा सहन केल्या असतील ! पशुचे जीवन आमचे, किमान मानवी अधिकार मिळावे, शेकडो वर्षाची गुलामी, अस्पृश्यता, अनन्वीत छळ , उघड्या डोळ्यांनी बघताना रक्त खवळावे ! हे सर्व पचवून संयमाने स्वतःला सक्षम केले . आम्हाला मुक्त करण्यासाठी ! आणि शेवटी ती संधी मिळविली , संविधान बनविण्याची संधी मिळविली . तो पर्यंत अनेक सत्याग्रह, समाज जागृती , स्वाभिमान निर्मिती , हे अविरत सुरूच ! दोन वर्ष , 11महिने, 18 दिवस हे तर केवळ संविधान लिहिण्यासाठी ! त्यापूर्वी 40 वर्षे, अर्धपोटी, उपाशी, अपमान, हाल अपेष्टा, शेकडो रात्रीचे जागरण, प्रकृती अस्वास्थ्य सहन केले , ते तापून सुलाखून निघण्यासाठी . एवढे केल्यानंतर संविधानात हक्क आणि अधिकार मिळवून देऊ शकले , कायद्याने, कोणाच्या मर्जीने नाही ! आणि म्हणून म्हणाले , ” अत्यंत हाल अपेष्टा सहन करून हा रथ मी इथपर्यंत आणला, शक्य झाल्यास पुढे न्या, परंतु कोणत्याही परिस्थितीत मागे जाऊ देऊ नका !” हा  ‘ ‘ रथ ‘ म्हणजे आमचे खरे स्वातंत्र्य, संविधानिक हक्क आणि अधिकार , व ते टिकविण्यासाठी सजग असलेली चळवळ होय !
                 मग हा रथ आता कुठे आहे ? पुढे  सरकला की मागे गेला आहे ? बाबासाहेबांच्या पश्चात मागील 70 वर्षात किमान शंभर वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली , परंतु मूलभूत अधिकार शाबूत आहेत ,  कोणतीही दुरुस्ती या मूलभूत अधिकारांना नष्ट करू शकली नाही . पण कोणी याही अविर्भावात राहू नये की यात ढवळाधवळ होणार नाही . मनुवादी साले हरामी आहेत, काँग्रेसी असोत की भाजपाई , एकाच माळेचे मनी आहेत . अनु . जाती , जमातीचे संविधानाच्या कलम 15, 16 नुसार आरक्षण कायम आहे , परंतु खाजगीकरणामुळे हे आरक्षण संपल्यात जमा आहे . आणि हे महापाप काँग्रेसनी केले आहे .त्याला भाजप ने समर्थन दिले होते, आता  नवीन शैक्षणिक धोरण भाजप ने लागू केले आहे , त्याला काँग्रेसने विरोध केला नाही . म्हणजे प्रत्यक्ष मूलभूत अधिकाराचे कलम कायम ठेऊन अप्रत्यक्ष त्याला प्रभावहिन करण्याचे षडयंत्र या सापनाथ नागनाथानी केले आहे . याचा विरोध आंबेडकरी चळवळीत एकट्या बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या पक्षाने केला . बाळासाहेब सजग असल्याने उच्च आणि तंत्र शिक्षणात खाजगी संस्थात अनु. जाती, जमातीना आरक्षण मिळाले आहे . सरसकट सर्व सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्यास या मनुवाद्यांची फाटत आहे . बाळासाहेब आंबेडकरांसारखा अभ्यासू आणि संविधानाचा सजग प्रहरी चळवळीत असल्याने हे मनुवादी सध्यातरी दचकून आहेत . काँग्रेसनी नखरे केले की बाळासाहेब तिला नंगे करतील  ही भीती त्यांना आहे . तरीही भाजप , काँग्रेसला ब्लॅकमेल करून अप्रत्यक्ष मदत मिळवून घेते . असेच एका मोठ्या षडयंत्रात काँग्रेस भाजप मिळून आहेत , ते म्हणजे EVM ! संविधानाने प्रत्येक नागरिकाला प्रौढ मताधिकार दिला आहे , तो भाजप काँग्रेसवाले प्रत्यक्ष  कलम रद्द करून हिरावून घेऊ शकत नाही , तेव्हा EVM द्वारे हे मनुवादी आमची मते चोरून अप्रत्यक्ष आमचा मताधिकार हिरावत आहेत .
       दलित, आदिवासी, भटके व मुस्लिमांचा नागरिकत्वाचा अधिकार हिरावून घेण्यासाठी काँग्रेस भाजप ने मोठे षडयंत्र केले , ते समजून घेणे गरजेचे आहे . भारतात NRC चे षडयंत्र कोणाचे आहे ? काँग्रेसचे आहे . आसाम मध्ये प्रथमता NRC काँग्रेसनेच आणले . एड . बाळासाहेब आंबेडकरासारखा बहुजनांचा सजग प्रहरी नसता तर भारतातील बहुसंख्य दलित, आदिवासी, भटके, मुस्लिम आज डिटेन्शन कॅम्पमध्ये नरक यातना भोगत असते .
                       भारतातील किमान 40% मागास आणि अल्पसंख्यांकांना आपल्याच देशात घुसपेठीये ठरवून छळण्याचा हा प्रकार होता . जर कांशीरामजी हयात असते तर या मनुवाद्यांची NRC आणण्याची हिम्मतच झाली नसती आणि तशी वेळही आली नसती . पण हे NRC चे संकट बाळासाहेबांनी परतविले .  देशभर NRC ला सुरुवात होणार होती , सर्व तयारी झाली होती , देशभरातील मुसलमान फार दहशतीत होता , घाबरला होता . नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जे पुरावे सादर करायचे होते , ते केवळ मुसलमानासाठीच नव्हते तर सर्वांसाठीच होते , परंतु CAB ला पुढे करून हे केल्या जात होते, केवळ मुसलमान वगळून प्रताडीत विदेशीना भारताचे नागरिकत्व देणारे ते बिल होते , म्हणून हे नागरिकत्व सिद्ध करणे हे मुसलमानासाठीच आहे, असा समज तयार करण्यात आला होता , तो दृढही होत गेला, कारण त्या विरोधात मोर्चे मुसलमानांचेच निघत होते, शाहीनबाग आंदोलनही मुसलमानांचे होते . परंतु यात ज्यांच्याकडे 70 वर्षांपूर्वीचा भारतीय असल्याचा महसुली पुरावा नसेल ते सर्व NRC त डिफाल्टर होतील , त्यात दलित, आदिवासी, भटके , गरीब ओबीसी हे ही भरडले जातील , हे स्पष्टच होते , परंतु या समूहाना गाफिल ठेवण्यात आले होते . हे भयंकर संकट आणि षडयंत्र बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले . आसाम मध्ये NRC झाला , 22 लाख लोक डिफाल्टर झाले , त्यातील 8 लाख मुसलमान होते , ही बातमी मेन स्ट्रिम मीडियातून समोर आली , डिटेन्शन कॅम्पमध्ये डांबलेल्यांचे vdo समोर आले . परंतु 22 लाखापैकी 8 लाख मुसलमान होते ,तर उर्विरीत 14 लाख कोण होते ? स्पष्टच आहे की ते गैरमुस्लिम होते , बहुसंख्य हिंदू होते . म्हणजे 14 लाख हिंदू डिफाल्टर झाले, 22 लाखात 14 लाख हिंदू डिफाल्टर निघाले .
               ही बाब राहुल गांधीच्या लक्षात का नाही आली ? सोनिया गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे  यांच्या लक्षात का नाही आली ? ही बाब बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली , त्यांनी मुंबईला या विरोधात मिर्चाचे आयोजन केले, सरकार उद्धव ठाकरेंचे होते, तरीही मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती , तरीही हजारो लोक आंदोलनात सहभागी झाले . ” NRC मुळे केवळ मुसलमानच नाही तर 40% हिंदू ही भरडल्या जातील ” ही बाब बाळासाहेबांनी भाषणातून  पुढे आणली , राज्यातल्या मीडियाने मोठी दक्खल घेतली , 40% हिंदू भरडल्या जातील ही बाब प्रथमताच जनतेसमोर आली, पण ती महाराष्ट्रपूर्तीच ! दोन दिवसांनी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांना समजावून सांगितले, आसामसारखेच बहुसंख्य हिंदू डिफाल्टर होतील , हे 40% हिंदू  गळ्यात दुपट्टे टाकून फिरणारे तुमचे  गरीब शिवसैनिक असतील ! ठाकरेंच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला, त्यांनी त्वरित प्रेस बोलाविली , जाहीर केले, ” NRC त 40% हिंदू भरडले जाणार, आम्ही महाराष्ट्रात NRC होऊ देणार नाही, विधानसभेत ठराव घेऊ “. झाले ! दुसऱ्या दिवशी देशभरातील मीडियाने ठाकरेंची ही बातमी ठळकपणे लावली, ती वनव्यासारखी पसरली , मग एका पाठोपाठ एक अरविंद केजरीवाल, नितीशकुमार, चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी अशा 11 राज्यातल्या गैरभाजप मुख्यमंत्र्यांनी NRC ला विरोध केला , केंद्राला शेवटी NRC गुंडाळावे लागले. एका मोठ्या संकटातून बाळासाहेब आंबेडकरांनी दलित , मागास, अल्पसंख्यांकांना वाचविले . युवराज राहुलजी आणि काँग्रेस यावेळी काय करीत होते ? असो.
                       हा ‘ रथ ‘ बाबासाहेबांनी इथवर ओढत आणला होता, आम्हा दलित , मागास , अल्पसंख्यांकासाठी ! उच्च जातीचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसला याचे काही देणेघेणे नाही म्हणून आमचा नागरिकत्वाचा मुख्य संविधानिक अधिकार हिरावून घेताना युवराज राहुलजी आणि काँग्रेस मूग गिळून गप्प राहिले . आतातर या काँग्रेसला बाळासाहेब शत्रू वाटतात , काही हरिजन चमचे हाताशी धरून यांनी बाळासाहेबाना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे . प्रो. रतनलाल आणि राजेंद्रपाल गौतम सारख्या गांडूंना पुढे करून काँग्रेस आता कांशीरामजींना व बहुजन संकल्पनेला  सुद्धा अव्यवहारिक ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे . म्हणून आम्ही बहुजनांनी हे लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेस काय षडयंत्र करीत आहे .बाळासाहेब असेपर्यंत काँग्रेस भाजप ने मिळून षडयंत्र केले काय किंवा त्यांचे बापालाही ( RSS ) त्यात सहभागी केले काय , फरक पडणार नाही !
      2024 च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब कदाचित सक्रिय नसते तर भाजप 400 पार गेला  असता , संविधान बदलाची प्रक्रिया केला झाली असती . सप्टे. 2023 च्या सुमारास भाजप च्या एका उच्च पदस्थ मीटिंग नंतर ‘ अबकी बार,  400 पार ‘ चा नारा पुढे आला , याकडे बाळासाहेबांचे लक्ष गेले , लगेचच भाजपच्या दोन खासदारांनी ‘ संविधान बदलून मनुस्मृती आणू ‘ अशी भाषा वापरली , बाळासाहेबांनी याला गांभीर्याने घेतले , देशातील बहुसंख्य लोक हे संविधानवादी आहेत हे आकलन त्यांचे होते , त्या आधारावर भाजप ला शिंगावर घेण्याचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला , होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका ह्या संविधानाच्या मुद्द्यावरच लढायच्या हे ठरविले !
                                 दुसरीकडे INDIA आघाडी बनली तरी  युवराज राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस ‘ भारत जोडो ‘ त मग्न होती , भाजपच्या संविधान बदलासाठी 400 पार कडे मुळी लक्षच नव्हते . बाळासाहेबांनी परिस्थितीला अचूकपणे हेरले, 25 नोव्हें. 2023 ला संविधान दिवस पर्वावर शिवाजी पार्क मुंबई येथे, संविधान सन्मान सभेचे आयोजन करून टाकले, लागलीच युवराज राहुलजींना या सभेचे मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण पाठवून गुगली टाकून दिली . सभेला अफाट गर्दी झाली , राहुल गांधींनी नाना पाटोलेना पाठविले , ती गर्दी बघून नाना अवाक झाले , बाळासाहेबांनी राहुल गांधींना आवाहन केले की त्यांनी त्यांचे सरकार असलेल्या राज्यात अशा संविधान सन्मान सभा घ्याव्या, त्यात बाळासाहेब सक्रिय सहभाग देतील . झाले ! बाळासाहेबांचे संविधानाबाबत ग्राउंडवरील आकलन त्या सभेमुळे राहुल गांधींच्या लक्षात आले, निवडणुकीत संविधानालाच मुद्दा करण्याची बाळासाहेबांची योजना त्यांना पटली , परंतु त्यांना हा मुद्दा हायजॅक करायचा होता , म्हणून त्यांनी  वंचितला झुलवत ठेवून india आघाडीच्या पद्धतशीरपणे बाहेर ठेवले, निवडणुका झाल्या , संविधानाच्या मुद्द्यावर झाल्या, भाजप 400 पार ऐवजी 240 वर  थांबला, त्यातही 79 जागा EVM ने भेट दिल्या , नाहीतर भाजप 160 वर गुंडाळल्या गेला असता . बाळासाहेबाना पराभव पत्करावा लागला, खरे संविधानवादी असलेल्या वंचित आणि बसप ची घोर निराशा झाली , पण संविधानावरील संकट टळले, ‘ रथ ‘ एकदम मागे जाऊन दरीत कोसळण्याचे संकट  टळले, पुन्हा एकदा बाळासाहेब संकटमोचक ठरले . म्हणून हा ‘ रथ ‘ किमान होता तिथेच आहे !
वाईट या बाबीचे वाटते की फुकटी, चोर काँग्रेस पुनर्जीवीत होऊन आंबेडकरवादी चळवळीचा बळी घेण्यास सज्ज झाली, त्याला आंबेडकरवादी बळी पडत आहेत ….. ( उर्वरित पुढील भागात , लवकरच . )

इंजि. नागवंश नगराळे ,
संस्थापक : बहुजन हितकारिणी सभा ,
चंद्रपूर , 8080149981

COMMENTS

You cannot copy content of this page