गडचांदुरात तिसऱ्या आघाडीमुळे चुरस वाढणार

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदुरात तिसऱ्या आघाडीमुळे चुरस वाढणार

गौतम नगरी चौफेर (शिला धोटे) : कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील येत असलेल्या  गडचांदूर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात तिसरी आघाडी उतरली असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असताना पक्षाने बगल दिल्यामुळे निलेश ताजणे यांनी शेवटी अॅड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात तिसरी आघाडी स्थापन केली. या आघाडीने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
💥पञकार परिषदेत अनेक कार्यर्त्याचे
निलेशदादाना गोळगोळ आशावाद💥

गडचांदूर शहरात शेतकरी

संघटनेचे पारंपरिक मतदार आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही – ग्रामपंचायत असताना त्यांनी सत्ता देखील मिळविली होती. गोंडवाना गणतंत्र पार्टीला येथील मानणारा मोठावर्ग आहे. तसेच श्रीतेज प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने गडचांदूर शहरात सर्वदूर विविध उपक्रम राबविले आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षासोबत अनेक वर्षांपासून राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे अरुण निमजे, माजी

नगरसेवक राहुल उमरे, रऊफ खान हे नगराध्यक्षपदासाठी बंडखोरी करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शरद जोगी यांनी देखील नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले आहेत. त्यामुळे गडचांदुरात भाजपा व काँग्रेससोबत तिसरी आघाडी मैदानात उतरल्याने आता खुप चुरशीच्या लढती रंगण्याची चिन्हे दिसून येत आहे. मात्र, यातून काहीजण माघार घेणार की कायम राहणार, हे नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कळणार आहे हे माञ
खरे असेल ,,,

COMMENTS

You cannot copy content of this page