अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून  ३९१ विध्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप

HomeNewsनागपुर डिवीजन

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून  ३९१ विध्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी  गडचांदूर) – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सी.एस.आर. अंतर्गत सतत सभोतालील गावाच्या प्रगतीकडे लक्ष देत आहेत. त्या करीत उद्याचे आधारस्तंभ असलेले  जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी चांगले शिकून प्रगती करावे या करिता आसपासच्या गांवातील जिल्हा परिषद शाळेला नेहमी मदत करत आले आहेत. यावेळेस माणिकगड ने सी.एस.आर. अंतर्गत सभोतालील १० गांवातील १० जिल्हा परिषद शाळेतील एकूण ३९१ गरजू विध्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप केल्यात. या शाळेमध्ये बैलमपूर, मानोली, जामणी, नोकारी, गोवारीगुडा, बॉम्बेझरी, लिंगनडोह, पेदासापूर, आसापूर व गढपंढरवानी या गांवातील शाळेचा समावेश आहेत. या शालेय बॅग वाटपादरम्यान गांवातील सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष, गांवातील प्रतिष्टीत नागरिक, शिक्षक वर्ग व सर्व विध्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमा बद्दल  गांवातील सरपंच,शिक्षक व नागरिकांनी माणिकगड कंपनीच्या व्यवस्थापनेचे मनातून आभार मानलेत.

COMMENTS