स्व. रामकृष्ण धोटे  यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त टेबल फॅन, गरम पाणी करण्याची विद्युत केटली व टेबल भेट.

HomeNewsनागपुर डिवीजन

स्व. रामकृष्ण धोटे  यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त टेबल फॅन, गरम पाणी करण्याची विद्युत केटली व टेबल भेट.

– आपुलकी फाउंडेशन राजुरा शेल्टरला दिली भेट.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा – ७ जुलै नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय कला साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या नागपूर विभाग सचिव ऍड .मेघा धोटे , मंदार धोटे यांनी स्वर्गीय रामकृष्ण धोटे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त राजुरा येथील आपुलकी फाउंडेशन शेल्टरला टेबल फॅन, गरम पाणी करण्याची विद्युत केटली व एक लाखडी टेबल भेट देऊन स्वर्गीय रामकृष्ण धोटे यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. यावेळी नेफडो संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, आपुलकी फाउंडेशन च्या कृतिका सोनटक्के , नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा तालुका संघटक मिलिंद गड्डमवार, माधुरी गड्डमवार, प्रशांत नागापुरे, रघुनाथ बताशंकर, सुरज महाडोळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वर्गीय रामकृष्ण धोटे यांना राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात त्यांना विशेष आवड होती. त्यांचा सामाजिक, सांस्कृतीक आवड असणारा वारसा त्यांच्या पत्नी, मुलांनी पुढे सूरू ठेवून सामाजिक दायित्व जोपासले आहे. आपुलकी फाऊंडेशन मधे रस्त्यावरील श्वान, गुरे ढोरे, मांजरी यांची काळजी घेतली जाते. त्यांच्यावर वेळोवेळी औषधोपचार करणे आणि त्यांच्या नैसर्गिक मुक्त अधिवासात सोडणे. अत्यंत गंभीर आजार, अपघातग्रस्त जनावरांना याठिकाणी सुरक्षीत ठेवले जाते. या प्राण्यांना गरम पाणी, उन्हाळ्यात थंड हवा याकरिता मेघा धोटे यांनी पुढाकार घेत वस्तू स्वरूपात मदत करून रामकृष्ण धोटे यांच्या स्मृतिस आदरांजली वाहिली आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे यापूर्वी
अरुणा बुटले, राजुरा तालुका महिला संघटिका यांच्या वाढदिवसानिमित्त छतावर झाकण्यासाठी प्लास्टिक फाडी भेट देण्यात आली होती. यावेळी सुनीता उगदे, माधुरी कुलकर्णी,  पुष्पा मेश्राम, मंदा सातपुते, बबीता कांबळे, सुमन कामडी, सूनैना तांबेकर आदींची उपस्थिती होती.

COMMENTS

You cannot copy content of this page