गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील भंडारा ते पवनी महामार्ग वाकेश्वर रोड फाट्यावर असलेल्या चाळीतील आर्यन धुर्वे राहणार वाकेश्वर यांच्या आर्यन बजाज कुलर इलेक्ट्रिकल दुकानाला दिनांक ७ डिसेंबर २०२५ ला रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान शॉर्टसर्किट मुळे आग लागून अंदाजे जवळपास १५ लाखाचे नुकसान व काउंटर मध्ये असलेल्या रोख १.५० लाख रुपये जळून व इलेक्ट्रिक सामान संपूर्ण जळून खाक झाले. त्यामुळे त्यांचे एकूण अंदाजे 17 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.आग नियंत्रित न झाल्यामुळे पवनी वरून १ व भंडारा येथून २ अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या .त्यामुळे आग नियंत्रणात आली असून संपूर्ण दुकानाची राख रांगोळी झालेली आहे.




COMMENTS