गौतम नगरी चौफेर (प्रतिनिधी, खुशाल जाधव,यवतमाळ जिल्हा) – आर्णी: पंचायत समिती कार्यालयामध्ये तांत्रिक सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले सुधाकर राठोड या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास देतात व काम करून देतो अशी बनवाबनवी करून पैसे लाटत असल्याची तक्रार दिनेश जाधव नामक शेतकऱ्यांनी दिनांक १३/९/२०२४ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्राराची दखल घेत त्या तांत्रिक सहाय्यकावरची तक्रारीची चौकशी करण्याकरिता तीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली तसे पत्र त्या अधिकाऱ्यांना देण्यात आले परंतु तब्बल पंधरा दिवस उलटल्यानंतर चौकशी करण्यात आली परंतु त्या चौकशीत काय निष्पन्न झाले यांचा अहवाल अजून पर्यंत प्राप्त न झाल्याने त्या अधिकाऱ्याकडून झालेली चौकशी संशयाच्या भोवऱ्यात दिसून येत आहे.चौकशी करणाऱ्या तीन महाशयांचा या लाचखोर तांत्रिक सहायकाशी अर्थपूर्ण संबंध तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे शेवटी हातात झालेले तक्रार करते यांनी न्याय मागण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
COMMENTS