अखेर….!! कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकरांचे निलंबन

HomeNewsनागपुर डिवीजन

अखेर….!! कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकरांचे निलंबन

मी नायब तहसीलदार नसल्याचे पत्रकारांना दिली प्रविण चिडे यांनी ग्वाही
-माझ्याकडे कोणत्याही अधिकार नाही

कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी रिपाइंच्या अध्यक्षा शिला धोटे यांनी केली

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी कोरपना):- चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुला  तालुक्यातील येत असलेल्या हिरापूर .आवारपूर  जवळपास असलेल्या  कढोली (खुर्द) ग्राम पंचायत  सरपंच आणि दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी राज्याचे वने, मत्स्य व्यवसाय, सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देऊन कोरपना तहसीलदारांनी लावलेली सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच तहसीलदाराचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी केली होती. याची शासनाने दखल घेत कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना निलंबित केले आहे.
उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, ग्रामपंचायत कढोली (खुर्द) च्या सरपंच सौ. निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सौ. सीता पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले. या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह संबंधितांना देण्यात आले होते. तरीही तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी 19 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीसाठी 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेतली व काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली.
अपिलाची मुदत 15 दिवस म्हणजे 27 ऑगस्टपर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेण्यात आली. तहसीलदार कोरपना यांनी आर्थिक व्यवहार करून एकतर्फी आदेश काढून घाई घाईने सभा घेतल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच सदर सरपंच निवड रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे . .दरम्यान मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक असललेले EWS व इतर दाखले काढण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला नियम व कायद्याचे डोस पाजणारे, नियमानुसार कामे करण्याचे आव आणणारे तहसीलदार व्हटकर यांनी सदर प्रकरणी नियमांची पायमल्ली केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या दरम्यान पुन्हा  शेतिचे कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना तारावरची कसरत करावी लागत असल्याने एक पत्रकार आपल्या शेतीच्या कामासाठी कोरपना येथील नायब तहसीलदार प्रविण चिडे यांच्या कडे गेले असता एकदम साहेब त्या पत्रकारावर रागवले कारण  चिडे तहसीलदार हा मोबाईल गेममध्ये खेडत असल्याने त्या पत्रकारावर संपूर्ण राग काढला … शेतीसाठी लागणारे कागदपत्रे (म्हणून आखार फोड करण्यासाठी आपली सही पाहिजे. रागाच्या भरात आरे मी तहसीलदार नाही, मी सहीच करत नाही. त्यावेळी अनेक नागरिक होते. ते तेव्हा हो साहेब ते पत्रकार आहेत मी पत्रकार यांना ओडखत नाही. मी पत्रकारांना गिणतीत घेत नाही. अनेक पत्रकार माझ्या  हातातील बाहूले आहेत. मी काही तहसीलदार नाही. तहसीलदार सुट्टीवर आहेत. तो येईल तेव्हा तोच सहीच करेल असा अनोखा सल्ला देणारे हे आदिवासी बहुल कोरपना तालुक्यातील (येथील वादग्रस्त नायब तहसीलदार चिडे . प्रकरण (१ हा नायब तहसीलदार नेहमीच मोबाईल एखाद्या लहान मुलासारखे हसून म्हणलाउन पहात असतो, त्यांच्या समोर कागदपत्रे फाईल आहे. किंवा अजून कोणी महिला, पुरुष नागरिक आपल्या समोर काही कामासाठी आले आहेत,
यांच्या कडे हा महाशय भाण ठेवत नसल्याने अनेकदा या कोरपना तहसील कार्यालयात किरकोळ अनेकदा वाद घडल्यांचे जानकर नागरिक सांगतात,
  कधीकधी तर मांजरवाडे लागल्या सारखे टवाळून पहात असल्याचे या वेळी अनुभव  ग्रामस्थांनी कथन केले आहे, करिता संबंधित विशेष अधिकाऱ्यांनी यांनी विशेष लक्षात घेऊन गुप्तमाहिती घेऊन योग्य नियोजित  कारवाई अशा कामचुकार अधिकारी यांच्यावर करण्याची मागणी
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया कोरपना तालुका अध्यक्षा शिला धोटे यांनी सदर प्रकार एका निवेदनातून रिपब्लिकनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रामदासजी आठवले साहेब न्याय राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना माहिती दिली असलेल्यांचे शिला धोटे यांनी  पत्रकारांना सांगितले …हे विशेष ..

COMMENTS