कोकण मराठी साहित्य परिषद शाखा पनवेल व डॉ. नागनाथ डोलारे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा. साहित्यिकांचा सत्कार, राज्यस्तरीय कवी संमेलनाचे 13 डिसेंबर 2026 रोजी पनवेल येथे कार्यक्रमाचे आयोजन.

HomeNewsनागपुर डिवीजन

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा पनवेल व डॉ. नागनाथ डोलारे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा. साहित्यिकांचा सत्कार, राज्यस्तरीय कवी संमेलनाचे 13 डिसेंबर 2026 रोजी पनवेल येथे कार्यक्रमाचे आयोजन.

गौतम नगरी चौफेर (नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी : प्रदीप कडबे पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा पनवेल यांच्या वतीने रविवार, दिनांक १३ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आंध्र कला समिती हॉल, सेक्टर-२, शांती निकेतन शाळेजवळ, नवीन पनवेल (पूर्व) येथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळा, साहित्यिकांचा सत्कार समारंभ व राज्यस्तरीय कविसंमेलन या भव्य साहित्य सोहळ्याचे उद्घाटन कवी, लेखक, विचारवंत प्रा. डॉ. रवी दलाल काटोल, नागपूर यांच्या हस्ते होणार असून हा कार्यक्रम सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. रवी दलाल हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार असून त्यांच्या हस्ते मा. डॉ. नागनाथ श्रीपती डोलारे यांच्या “माझे जीवन” व मा. रावसाहेब कळसे यांच्या “माणुसकी” या दोन पुस्तकांचे प्रकाशन देखील होणार आहे. या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान रायगड भूषण मा. प्रा. एल. बी. पाटील, विश्वस्त को. म. सा. प. हे भूषवणार असून पुस्तक प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका अॅड. सुनिता जोशी व कवी, गझलकार, समीक्षक रोहिदास पोटे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सत्रात प्रमुख अतिथी तथा भाष्यकार म्हणून कवयित्री, साहित्यिका, विचारवंत मा. प्राचार्या डॉ. निर्मला भामोडे, अकोला व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. ग्रीष्म शोभा माणिकराव खोब्रागडे, बिर्ला कॉलेज, कल्याण या उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर मा. राजू चिमणकर, मा. पुंडलीकराव भामोदे मा. बबनराव मोरे, महाराष्ट्रातील प्रख्यात लेखक समिक्षक डॉ. विभूतीचंद्र गजभिये हे उपस्थित राहणार असून ,डॉ विभुतीचंद्र गजभिये यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सोबत २३ साहित्यिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० ते १.०० भोजन अवकाशानंतर दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी कवयित्री व समीक्षक मा. प्रा. डॉ. सुजाता राऊत या राहणार असून सूत्रसंचालन मा. विशाल पवार हे करणार आहेत. या कविसंमेलनात राज्यभरातून आलेले ६० हून अधिक निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा तारे या करणार असून आभार प्रदर्शन काशिनाथ जाधव हे करणार आहेत. या सोहळ्याला अध्यक्ष सुभाष कुडके, उपाध्यक्ष डॉ. नागनाथ डोलारे, विजय गायकर व कवी रावसाहेब कळसे यांच्यासह परिषदेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत असून सर्व साहित्यप्रेमी, कवी, लेखक व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page