गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील अड्याळ व पहेला येथील मेन रोड हायवे लगतच्या सार्वजनिक नालीवर दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कारवाई करण्यास आज दिनांक 21 नोव्हेंबर 2026 पासून सुरुवात झालेली आहे.
पावसामुळे कारवाई अर्धवट थांबवावी लागली. यामध्ये अल्प प्रमाणात अतिक्रमण सुद्धा काढण्यात आले. उर्वरित अतिक्रमण उद्या परवा काढण्यात येणार असल्याचे माहिती विभागाकडून कळते. भंडारा ते निलज हायवे रस्त्या अंतर्गत अड्याळ व पहेला येथे नालीवर अतिक्रमण करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांस कमालीचा त्रास सहन करावा लागतो. नालीवरील अतिक्रमण मोकळे होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित अतिक्रमण लवकरात लवकर काढावे अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.


