(गडचांदुर) संतोष पटकोटवार (गौतम नगरी चौफेर) – गडचांदुर नगर परिषद प्रभाग क्रमांक दोन च्या नगरसेविका सौ, सारिका नितीन डोरलीकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गडचांदुरात विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले असुन यात नाली बांधकाम साई मंदिर परिसरात काँक्रिट रोडचे बांधकाम रोडच्या साइडला गट्टू बसविणे सापसफाई अभियान राबविणे हॉटेल ग्रीनपार्क च्या मागील भागात काँक्रिट रोडचे बांधकाम व नाली बांधकाम झाडे लावून पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले असुन येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात प्रभाग क्रमांक दोनचा चेहरा मेहरा बदलून टाकण्याची गवाही त्यांनी नागरिकांना दिली असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या भूमिपूजन छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगर परिषदेचे नगर अध्यक्ष श्री निलेशजी ताजने, बांधकाम सभापती रामसेवक मोरे, आरोग्य सभापती तुषार बावणे,नगरसेवक महेश आवारी, नगरसेविका सौ, अश्विनी ताई कांबळे, शहर विकास आघाडीचे संदीप भाऊ शेरकी, प्रभाकरजी शेरकी, नथूजी हुलके गुरूजी, वाजीद शेख सर, नितीन डोरलीकर, राजेश बोगावार गुंडावार गुरुजी बबन सोनवणे, भारत टाकसांडे व वॉर्डातील इतर नागरिक उपस्थित होते,


