गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

HomeNewsनागपुर डिवीजन

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – आज दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून गोसेखुर्द  गावातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात याव्यात याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे बेमुदत आमरण उपोषण जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत सुरू राहणार असल्याचे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त समितीचे अशासकीय सदस्य भाऊ कातोरे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये  प्रकल्पग्रस्त नोकरी करिता प्रमाणपत्र देण्यात आले ते 2022- 23 पासून रद्द करण्यात आले ते पूर्ववत करण्यात यावे, वाढीव कुटुंबाला 2.90 लक्ष रुपये, प्रकल्पग्रस्त प्रकल्प बाधित व अंशतः बाधित यांना देण्यात यावे, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त भूमीहीनांना कमीत कमी एक एकर शेत जमीन देण्यात यावी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त बेरोजगार असल्याने त्यांना पोट भरण्याकरिता रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरामुळे भरपूर नुकसान होत असल्यामुळे त्या गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे, 75% शेतजमीन गेलेले अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे, करिता गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तप अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातोरे, शेषराज रामटेके, अतुल राखोरते, सुनील भोपे, दिलीप मडामे, प्रमिला शहारे, मंगेश पडोळे, कमलेश सुखदेवे, बाळू ठवकर, पुरुषोत्तम गायधने, मयुरी सुखदेवे, दिनेश राघोरते, महेश नखाते आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

COMMENTS