– 2 फेब्रुवारीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बेला ग्रामपंचायतला भेट देणार
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मराठी चित्रपट सैराट फिल्म अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) २ फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्ह्यात असणार आहे. या अभियानांतर्गत या बेला ग्रामपंचायतला भेट देणार आहेत. रिंकू राजगुरू व राज्यस्तरीय चमू भंडारा येथे १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दाखल होणार असून भंडारा येथे त्या मुक्कामी राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी २ फेब्रुवारीला भंडारा तालुक्यातील बेला ग्रामपंचायत येथे सकाळी ९.४० वाजता भेट देऊन राज्यस्तरीय चमूसह मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाला उपस्थित राहून पुढील कार्यक्रमाला रवाना होतील .सदर प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



COMMENTS