हर्षल विनायक काळे यांची बँक ऑफ इंडियाच्या “असिस्टंट मॅनेजर” पदी निवड झाली.

HomeNewsनागपुर डिवीजन

हर्षल विनायक काळे यांची बँक ऑफ इंडियाच्या “असिस्टंट मॅनेजर” पदी निवड झाली.

अँड वामनराव चटप माजी आमदार राजुरा यांनी सत्काराने सन्मानित केले.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा: आज दिनांक 03/05/25 रोजी ठीक सकाळी 9:30 वा. मौजा कढोली बूज येथे गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांचा मुलगा, हर्षल विनायक काळे यांनी बँक परीक्षेत जीवापाड अभ्यासाची मेहनत करून यश संपादन केले. बँक संदर्भातील व्यावहारिकतेच्या पदाची उच्च पदस्थ बँक ऑफ इंडिया या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली. या नियुक्ती बद्दल या विभागाचे माजी आमदार अँड वामनराव चटप यांनी निवडीचे गांभीर्य घेऊन प्रत्यक्ष कढोली बूज येथील त्यांच्या घरी जाऊन हर्षल काळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, विदर्भाविषयाचे पुस्तके, देऊन सत्काराने सन्मानित केले.
यावेळी प्रामुख्याने उपस्थित रमेश नळे, शेषराव बोंडे, प्रभाकर ढवस, दशरथ हिंगाणे, विनायक पोडे, दत्ता हिंगाणे, विनायक काळे, संतोष हिंगाणे, खुशाल आस्वले, नरेंद्र मोहारे, मधुकर चिंचोलकर, सौरभ मादासवार या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला.

COMMENTS

You cannot copy content of this page