डोहे ले-आऊटमध्ये साचले सांडपाणी; आरोग्य धोक्यात, नगर परिषदेची गंभीर दुर्लक्ष!

HomeNewsनागपुर डिवीजन

डोहे ले-आऊटमध्ये साचले सांडपाणी; आरोग्य धोक्यात, नगर परिषदेची गंभीर दुर्लक्ष!

गडचांदूर, ता. १० मे – शहरातील डोहे ले-आऊट परिसरात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी साचल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गावातील मुख्य नालीचा बांध फुटल्यामुळे संपूर्ण नाल्याचे पाणी थेट या रहिवासी भागात जमा झाले आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा उपद्रव वाढत आहे.

पावसाचे पाणी आणि नाल्याचे सांडपाणी एकत्र साचल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या परिसरात अनेक कुटुंबे राहतात आणि लहान मुले, वृद्ध यांना याचा थेट फटका बसत आहे.

स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला असून, नगर परिषद आरोग्य विभागाकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. “शहरातील आरोग्य व्यवस्थेकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे,” अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.

या घटनेची गंभीर दखल घेऊन नगर परिषद आणि आरोग्य विभागाने तत्काळ पावले उचलावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page