गडचांदुर ट्राफिक पोलीसानी वाहतूक नियंत्रणाकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदुर ट्राफिक पोलीसानी वाहतूक नियंत्रणाकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज

– संतोष पटकोटवार यांनी केली संबंधित विभागाकडे मागणी
गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – गडचांदुर येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सूरू आहे,रोडच्या मधोमध टिनाचे पत्रे लावलेले आहें त्यामुळे वाहनाना ये–जा करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे, अरूंद रस्त्यामुळे नागरीकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहें, बस स्टाप चौकात प्रवाशांची गर्दी जमलेली असते, ये –जा करणा–या नागरीकांचे जीवीत हानी होऊं नये कूणाचा नाहक बळी जाऊं नये यासाठी ट्राफिक पोलिस बंदोबस्त चोख असायला पाहीजे पेट्रोल पंप चौक ते शेडमाके चौकापर्यत वाहतूक नियंत्रणाकडे ट्राफिक पोलीसानी जास्तीत जास्त लक्ष द्यावें अशी मागणी  माजी ग्राम पंचायत सदस्य तथा शेतकरी संघटनेचे सरचिटनीस संतोष पटकोटवार यांनी संबंधित विभागाकडे केली आहे

COMMENTS

You cannot copy content of this page