HomeNewsनागपुर डिवीजन

वासुदेवराव सोमलकर गुरुजींच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना छत्री वाटप.

दोन महिन्यांच्या मोफत पाणपोई उपक्रमाचा समारोप.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.३ जुलै समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून वासुदेवराव सोमलकर गुरुजी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद राजुरा येथील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करत त्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. याचबरोबर १ मे २०२६ ते १ जुलै २०२६ या कालावधीत छोटुलाल सोमलकर यांचे तर्फे नागरिकांसाठी सुरू असलेल्या मोफत पाणपोई उपक्रमाचा समारोपही उत्साहात पार पडला. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने छोटूलाल सोमलकर यांच्या पुढाकारातून सलग दोन महिने मोफत पाणपोई सुरू ठेवण्यात आली होती. या उपक्रमाचा लाभ हजारो नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, कामगार तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी घेतला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी नगर परिषद राजुरा येथील सफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक साहित्य म्हणून छत्रीचे मोफत वितरण करण्यात आले. त्यांच्या दैनंदिन सेवेला सलाम करत हा उपक्रम राबविण्यात आला. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमास छोटूलाल सोमलकर, गजेंद्र ढवस, गजानन पहानपटे, नांदे, बादल बेले, उद्धवराव लांडे, दिलीप सदावर्ते, राजेश बजाज, मोहन धोटे, दक्ष सर, रमेश निमकर, जितेंद्र देशकर, सचिन वराटकर, प्रणय विरमलवार, हितेश डाखरे, भारत भोयर, नितीन बावणे, मंगेश बोरकुटे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी वासुदेवराव सोमलकर गुरुजींना ८० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

    You cannot copy content of this page