आदर्श हायस्कूल राजुरा शाळेची इयत्ता दहावीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

HomeNewsनागपुर डिवीजन

आदर्श हायस्कूल राजुरा शाळेची इयत्ता दहावीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

– माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंतांचा बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने केला सत्कार.

गौतम नगरी चौफेर // बादल बेले राजुरा – १४ मे बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श हायस्कुल राजुरा येथील इयत्ता दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला एकुण ९३ विध्यार्थी बसले असून निकालाची टक्केवारी ९५.७० टक्के एवढी आहे. शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त आदित्य सुभाष साळवे ९१.२० टक्के, द्वितीय क्रमांक मृणाली बंडू भोयर ९०.२० टक्के , तृतीय क्रमांक क्षितिज विनोद वडस्कर ८९.६० टक्के असे आहेत.  आदर्श हायस्कूल शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा माजी आमदार ॲड.संजय धोटे, अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक मधुकर जानवे, अविनाश नीवलकर, मंगला माकोडे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक नवनाथ बुटले, मेघा वाढई, सहाय्यक शिक्षक प्रशांत रागीट, विकास बावणे, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर, अंजली कोंगरे आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS