आवारपूर अल्ट्राटेक द्वारा नागपुर येथे आयोजित महिला शेतकरी सहल मध्ये १२ गावातील ४७ महिला शेतकऱ्यांचा समावेश

HomeNewsनागपुर डिवीजन

आवारपूर अल्ट्राटेक द्वारा नागपुर येथे आयोजित महिला शेतकरी सहल मध्ये १२ गावातील ४७ महिला शेतकऱ्यांचा समावेश

गौतम नगरी चौफेर (शिला धोटे) – कोरपना आदिवासी तालुक्यातील येत असलेल्या आवारपूर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील महिला शेतकऱ्यांना शेती बाबत आधुनिक तंत्रज्ञान बद्दल अवगत करण्याकरिता शिवाय पाश्र्चिमात्य देशातील तांत्रिक शेती बद्दल विविध तंत्राचा, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची ओळख परिसरातील महिला शेतकऱ्यांना शेतीची उत्पादकता वाढावी परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी या उद्देशाने आवारपुर, बिबी, नांदा, नोकारी, पालगाव, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, बाखर्डी, तळोधी, हिरापूर  व सांगोळा गावातील ४७ महिला शेतकऱ्यांनी नागपूर येथील ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीला दिनांक २४.११.२०२४ ला भेट दिली. या माध्यमातून महिला शेतकरी यांना विविध प्रात्यक्षिकांची अणूभुती आणून देण्यात आली. कंपनीच्या वतीने नमीत मिश्रा (एफ.एच.- एच.आर) व नारायण दत्त तिवारी (एच.ओ.डी. – ई .आर.) यांच्या मार्गदर्शनाखाली  सी.एस.आर. विभाग प्रमुख, प्रतीक वानखेडे व  संजय ठाकरे यांनी सदरचा उपक्रम यशस्वीरित्या राबविला. त्यासाठी सदर महिला शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS