वटपौर्णिमेनिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे सावली देणाऱ्या व फळ झाडांच्या वृक्ष बियांचे पॉकेट वाटप.

HomeNewsनागपुर डिवीजन

वटपौर्णिमेनिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे सावली देणाऱ्या व फळ झाडांच्या वृक्ष बियांचे पॉकेट वाटप.

– वृक्षपुजेकडून वृक्षसंवर्धनाकडे वाटचालीचा दिला संदेश.

गौतम नगरी चौफेर राजुरा १० जुन – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राष्ट्रिय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, राष्ट्रीय महिला हिंसा प्रतिबंधक समितीच्या पदाधिकारी, सदस्य, संघटीका महिलांनी एकत्रित येऊन वटपौर्णिमा निमित्याने विवीध वृक्षांच्या बियांचे पॉकेट तयार करून  वडाच्या झाडाचे पूजन करणाऱ्या महिलांना दिले. वृक्षपुजेकडून वृक्षसंवर्धनाकडे हा संदेश यानिमित्ताने देण्यांत आला. पंचायत समिती चौक येथील जनावरांच्या रुग्णालय परिसरात आसलेल्या वडाच्या झाडाखाली व जवाहर नगर वार्डातील माता मंदीर परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सूनैना तांबेकर, नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा, राजुरा तालुका महिला संघटीका बबिता कांबळे, सुवर्णा बादल बेले, बाल संघटीका दुर्वा बेले, ओवी बेले, महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष रवी बुटले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. वडाच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व अतिशय महत्वपूर्ण आहे. हजारो पक्षी, कीटक, जीव यांना हे झाडं अभय देते. सर्वात जास्त आयुष्य वडाच्या झाडाला असते. गुरे ढोरे उष्णता असली की त्या झाडाखाली निवांत बसतात. सर्वात जास्त प्राणवायू देत असतो. या प्राणदात्याला न विसरता त्याची महानता जाणुन त्याचे संगोपन करावे असे आवाहन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले.

COMMENTS

You cannot copy content of this page