नंदलाल पाटील कापगते विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

नंदलाल पाटील कापगते विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे “भारतीय संविधान दिन” वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा करण्यात आले. भारतीय संविधानाविषयी जनतेमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून विद्यालयात साजरा करण्यात येतो तसेच 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
        या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती आर. बी. कापगते तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. के.जी. लोथे, प्राध्यापिका स्वाती गहाणे, डी.एस.बोरकर ,एम.एम. कापगते व इतर प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित होते.
        याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करून माल्यार्पण मुख्याध्यापिका आर.बी. कापगते यांचे हस्ते करून अभिवादन करण्यात आले तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी सामुदायिक संविधान उद्देशिकेचे वाचन करून प्रतिज्ञा घेतली.
           याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापिका उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, प्रत्येक भारतीय नागरिकांनी संविधानाप्रती आदर आणि निष्ठा ठेवून वागले पाहिजे, घटनेतील तत्त्वाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आचरणात व व्यवहारात प्रत्यक्षपणे वर्तनात चांगले परिवर्तन केले तर निश्चितच देशाचा व्यवहार चोक होईल, देशाची आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थिती भक्कम होऊन देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले.
        यावेळी विद्यालयातील प्रा. के.जी. लोथे सर यांनी सुद्धा संविधान दिनाचे महत्त्व सांगून राज्यघटना व मसुदा समिती याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
         कार्यक्रमाचे संचालन आर.व्ही.दिघोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन डी.एस. बोरकर सर यांनी केले.
          कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page