अनुकंपा तत्व व एमपीएससी शिफारस्न्वै १६५ जनानां नियुक्ती पत्र.
गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण एस. देशभ्रतार भंडारा :- प्राप्त झालेल्या जिल्हास्तरीय माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री श्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा शा. नि. क्र. अनेक. पत्र क्र.२५२७ दि.१७/०७/२०२५ व निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके यांचे पत्र क्र.क्रमस/आस्था/५/कावि/१८४/२५ दि.२५/०८/२०२५ च्या पत्रानुसार भंडारा जिल्ह्यातील विविध शासन सेवेतील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या एका नामनिर्देश केलेल्या वारसांना पोलीस बहुउद्देशीय सभागृह पोलीस मुख्यालय भंडारा शनिवार ४ ऑक्टोंबर २०२५ रोजी ११:३० वाजता. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कदम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब दुरुन हसन भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर व विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्वावर उमेदवारांना व महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे शिफारसी प्राप्त गट क एकूण १६५ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामुळे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या परिवारात चेहऱ्यावर हास्य फुलून सरकारचे अभिनंदन केले.


COMMENTS