रजत राऊत यांना जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित

HomeNewsनागपुर डिवीजन

रजत राऊत यांना जिल्हास्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित

गौतम नगरी चौफेर भंडारा – अड्याळ येथे सध्या वास्तव्यात असलेले रजत राऊत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पहेला येथे सन्मान द्या व सन्मान घ्या या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार, कवी, शासकीय कर्मचारी, अधिकारी, शाहीर, कलाक्षेत्र व इतर क्षेत्रांमध्ये हे उत्कृष्ट कार्य करतात. परंतु शासन स्तरावर त्यांची दखल घेतली जात नाही म्हणून अशा कार्यकर्त्यांची दखल व्हावी, त्यांच्या कार्याची कदर व्हावी, व त्यांना सन्मान मिळावा , व त्यांच्या कार्याला गती मिळावी या उदात्त हेतूने सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याचा भव्य पुरस्कार सत्कार सोहळा सम्यक बुद्ध विहार पहेला येथील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यात रजत राऊत यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जिल्हा युवा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रजत राऊत यांनी पहेला येथे मुला मुलींच्या बौद्धिक विकासाकरिता अभ्यासिका सुरू केली असून त्यात बरेच विद्यार्थी /विद्यार्थिनी विविध जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी त्यांनी कुही तालुक्यातील मालची बानोर येथे घर उध्वस्त झालेल्या बोरकर परिवाराला अनाज व किराणा साहित्याची थोडीफार मदत केली होती. तसेच कुही तालुक्यातील मसली बौद्ध विहाराला धम्मदान वस्तू स्वरूपात दान देण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृपा ढवळे ,सोपान खोब्रागडे व त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

याप्रसंगी डॉ.खुशाल बोपचे माजी खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ , दैनिक माझा मराठवाडा तथा ज्ञानपंख न्यूज चॅनलचे चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर ,फिल्म अभिनेता अश्विनकुमार वघाले, फिल्म अभिनेत्री चैताली भस्मे, अशोकराव सोनवणे फुले, शाहू ,आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत छत्रपती संभाजी नगर, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्ण, ब्लू स्टार टीव्ही न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार संजीव भांबोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, पुष्पगुच्छ, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले .

You cannot copy content of this page