भंडारा येथील इंद्रलोक सभागृहात रिपब्लिकन ऐक्य संकल्प मेळावा संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

भंडारा येथील इंद्रलोक सभागृहात रिपब्लिकन ऐक्य संकल्प मेळावा संपन्न

विविध गटात विखुरलेल्या आंबेडकर गटातील कार्यकर्त्यांची उपस्थिती

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – एकच लक्ष रिपब्लिकन ऐक्य, हाक एकतेची निळ्या पाखरांची ,संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ राज्य जिल्हा भंडाराच्या वतीने रिपब्लिकन ऐक्य मेळावा 19 ऑक्टोबर 2024 ला इंद्रलोक सभागृह नागपूर रोड संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन अमृत गजभिये संयोजक संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ राज्य यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमृत बनसोड साहित्यिक संयोजक रिपब्लिकन आघाडी विदर्भ उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सदानंद इलमे मुख्य समन्वय जनगणना परिषद भंडारा जिल्हा, चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद भंडारा, अजबराव चिचामे सल्लागार ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन भंडारा जिल्हा, गोपाल सेलोकर ओबीसी सेवा संघ भंडारा जिल्हा, सुरेश मोटघरे बी आर एस पी , विक्रांत भालाधरे अध्यक्ष आजाद समाज पार्टी भंडारा जिल्हा, विजय मेश्राम माझी इंजिनीयर वडसा, के झेड शेंडे माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा, वरील मान्यवरांनी आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार राहील किंवा नाही किंवा संयुक्त रिपब्लिकन आघाडी जो निर्णय घेईल त्या उमेदवाराला येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ग्यानचंद जांभुळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसित बागडे यांनी केले तर आभार विजय भोवते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता  ज्ञानचंद जांभुळकर, विजय भोवते, दिलीप वानखेडे, पत्रकार संजीव भांबोरे, प्राध्यापक सुरेश खोब्रागडे, प्राध्यापक रमेश जांगडे, राजेश मडामे, शिवदास गजभिये, यांनी सहकार्य केले. यावेळी भंडारा जिल्ह्यातील आंबेडकर गटात विखुरलेल्या असलेल्या विविध कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

COMMENTS