आवाळपूर–नांदाफाटा रस्त्याची दुरवस्था; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गौतम नगरी चौफेर : प्रभाकर खाडे- आदिवासीबहुल कोरपना तालुक्यातील -आवाळपूर -नांदाफाटा मुख्य मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर खड्ड्यांची भरती झाल्याने कधीही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्र तसेच वणी विधानसभा क्षेत्राला जोडणारा कोरपना तालुक्यातील गडचांदूर -आवाळपूर-नांदाफाटा -हिरापूर- सांगोडा- अंतरगाव – नारंडाफाटा -वनोजा वणी जानारा मुख्य रस्ता प्रवाशांच्या सोयीकरिता तयार करण्यात आला. या रस्त्यावरून रात्रंदिवस अनेकांचा प्रवास सुरू असतो. कोरपना तालूक्यातिल गडचांदूर–आवाळपूर ते वणी तालुका जोडणारा रस्ता हा शॉर्टकट मार्ग असल्यामुळे याच मार्गाने जाने नागरीक पसंत करीत आहे,आणी याचभागात आवारपूर अल्ट्राटेक सिमेंट कंपणी ,गडचांदूर अल्ट्राटेक सिमेट कंपणी व अंबुजा सिमेंट कंपणी या कोरपना तालुक्यातील आवाळपूर सेजारी असल्यने अनेक सिमेंट भरलेले वाहन पन्नास/50 टणाच्या गाड्या सिमेंट व कोळसा घेऊन याच आवाळपूर–नांदाफाटा–हिरापूर याच गावातून ये–जा करतो (हे) यवळे जळ वाहतूक या रस्त्याने रोज हजारो गाड्या जात असल्याने ह्या रस्त्याची वाटच लागली आहे :
⚡दुरवस्था झालेला आवाळपूर-नांदाफाटा- रस्ता⚡
नागरिकांचा प्रवास दिमाखात सुरू असतो. तसेच परिसरातील शेतकरी शेतातील पिकाची ने-आण करण्याकरिता याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, सध्या या रस्त्याची मोठ्या प्रमानात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील गिट्टी निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. तथापि, या रस्त्यावर मोठा अपघात होऊन एखादी अनुचित घटना घडली तर, याची जबाबदारी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी घेईल का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेकदा पुर्व ग्रामपंचायत आवाळपूर च्या सदस्या शिला गौतम धोटे यानी केली आहे.





COMMENTS