अविनाश कीर्ती अभिनेता प्रशिक्षक पुणे
– राजुरा येथे तिन दिवशी अभिनय ॲक्टिंग कार्यशाळा.
– मराठी कलाकारांची उपस्थिती ठरली लक्षवेधी.
गौतम नगरी चौफेर //राजुरा २४ मे दादा साहेब चित्रपट युनियन मुंबई व ज्ञानदीप ॲक्टिंग अकादमी कलामंच चंद्रपूर – राजूरा द्वारा राजुरा येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात निःशुल्क तीन दिवशीय अभिनय ॲक्टिंग कार्यशाळा आयोजीत करण्यात आली. सदर शिबीर दिनांक २३ ते २५ मे दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत
श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील सभागृहात आयोजीत करण्यात आले. या शिबिराला अण्णा लोंढे, अभिनेता प्रशिक्षक पुणे, मारोती सरपोतदार,डी.ओ.पी. फोटोग्राफी पुणे, अविनाश कीर्ती, अभिनेता प्रशिक्षक पुणे यांच्यासह राजेंद्र पचारे, ओमप्रकाश गुंडावार, अंजली गुंडावार ,मनोज तेलिवार,बादल बेले, मोरेश्वर रामचंद्र लोहे, स्वतंत्रकुमार शुक्ला, सुनील भगत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम.वारकड यांच्या सहकार्यातून महाविद्यालयातील सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पचारे यांनी तर आभार ओमप्रकाश गुंडावार यांनी केले. यावेळी शिबिरार्थी, पालक व ज्यांनी पुर्वी प्रशिक्षण घेऊन स्वतः भूमिका केली त्यांनी आपले मनोगत, अनुभव व्यक्त केले.
———————————————
यांची उपस्थिती ठरली लक्षवेधी
अण्णा लोंढे, अभिनेता प्रशिक्षक पुणे
सर्जा राजा, फौजदार, मास्तर एके मास्तर, कर्तबगार, सांगतो एका तिखाबाई, वर्तमान, तू तेव्हा तशी, ज्योतिबा सावंत, अंगारकी, राजा शिवछत्रपती, क्राईम डायरी अशा अनेक चित्रपट, मालिका , वेब सिरीज मधे त्यांनी भूमिका साकारली आहे. त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक भूमिका सादरीकरण करण्यात आले.
———————————————
अविनाश कीर्ती, अभिनेता प्रशिक्षक पुणे
स्वामी समर्थ, क्राईम डायरी, अग्निहोत्री, लक्ष, मुलगी झाली हो, आई कुठे काय करते, गाथा नवनाथाची, उदे ग अंबे, तुला जपणार आहे, तूही रे मितवा, लक्ष्मी निवासी, शिवा, आई तुळजा भवानी, रक्तांचल २, देवा, अंडरग्राऊंड , कालचक्र, बेस्टिज, नॉक आऊट, द इंडिया स्टोरी, स्नेक बाईट, भुंडीस, जय जय महाराष्ट्र माझा, अरे आवाज कुणाचा, बॅक टू स्कूल, १६ व्यावसायिक नाटक, हिंदी – मराठी चित्रपट आणि वेब सिरीज, मालिकांमध्ये अविनाश कीर्ती यांनी अभिनय केला आहे. स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठीं, उणीवा भरून काढण्यासाठी, प्रशिक्षण घेऊन स्वतःतील कलाकार घडविण्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अविनाश कीर्ती यांनी केले.
———————————————
राजेंद्र पचारे, मुख्य आयोजक
मोठ मोठ्या मेट्रो सिटी मधे होणारे ॲक्टिंग अभिनय कार्यशाळा यामधे बरेचदा ग्रामीण भागातील विध्यार्थी, कलाकार जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अभिनय, कला , कलाकारही दुरावलेली असते. या तीन दिवशीय प्रशिक्षणातून स्थानीक कलाकारांना प्रोत्साहन देणे, संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास, भाव भावना, वकृत्वकला, कथा सादरीकरण, नवरस माहितीवर चर्चा, प्रात्यक्षिक, अभिनय करून घेण्यासाठी त्यांची माहिती मिळावी म्हणुन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.


COMMENTS