गौतम नगरी चौफेर (सुभाष सातपुते सोनुर्ली) – चार पैकी चार चॅम्पियनशिप पटकावत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनुर्ली (वन.) चे ऐतिहासिक यश
बीट स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 22 व 23 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, माथा येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली (वन.) येथील विद्यार्थ्यांनी सर्वच विभागात दैदीप्यमान कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप, माध्यमिक मैदानी चॅम्पियनशिप, प्राथमिक मैदानी चॅम्पियनशिप व सांस्कृतिक चॅम्पियनशिप अशा एकूण चार पैकी चारही चॅम्पियनशिप शाळेने पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
प्राथमिक विभागात खो-खो (मुले) प्रथम, खो-खो (मुली) प्रथम, 100 मीटर धावणे (मुले) प्रथम, 100 मीटर धावणे (मुली) प्रथम, 200 मीटर धावणे (मुले) प्रथम, 200 मीटर धावणे (मुली) प्रथम, उंच उडी (मुले) प्रथम, उंच उडी (मुली) प्रथम, लांब उडी (मुले) प्रथम, लांब उडी (मुली) प्रथम अशी जबरदस्त कामगिरी विद्यार्थ्यांनी केली.
माध्यमिक विभागात कबड्डी (मुली) प्रथम, खो-खो (मुले) प्रथम, खो-खो (मुली) प्रथम, लांब उडी (मुले) प्रथम, लांब उडी (मुली) प्रथम असे उल्लेखनीय यश शाळेच्या नावावर नोंदले गेले.

सांस्कृतिक विभागात फॅन्सी ड्रेस प्रथम, समूह गायन प्रथम, समूह नृत्य प्रथम तसेच वैयक्तिक गायनमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांनी कला, सादरीकरण व आत्मविश्वास यांचे उत्कृष्ट दर्शन घडवले. या अभूतपूर्व यशामागे मुख्याध्यापिका प्रभावती हिरादेवे यांचे सक्षम नेतृत्व तसेच शिक्षक विजय राऊत, मेनका मुंडे, भास्कर मडावी, सुनील अलोने व शिक्षणप्रेमी पल्लवी कांबळे यांच्या सातत्यपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शनाची मोलाची भूमिका राहिली.
कार्यक्रमाच्या यशासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश मोहितकर यांच्यासह सुजाता पडवेकर, शंकर बोढाले, कैलास कांबळे, संदीप परचाके, उज्वला नगराळे, शीतल चाटारे, सोनाली हरेकुमरे, मीनाक्षी काटकर तसेच संपूर्ण ग्रामस्थ सोनुर्ली यांचे अमूल्य सहकार्य लाभले. या यशाला गटशिक्षणाधिकारी मा. कल्याण जोगदंड व बीट विस्तार अधिकारी (शिक्षण) मा. विलास देवळकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाची जोड लाभली. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, शाळेच्या शैक्षणिक-सहशैक्षणिक प्रगतीचा अभिमान व्यक्त केला जात आहे


COMMENTS