मा. आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विवीध उपक्रमांनी साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

मा. आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विवीध उपक्रमांनी साजरा



गौतम नगरी चौफेर //बादल बेले राजुरा //युवासेना प्रमुख व शिवसेना नेते,माजी मंत्री महाराष्ट्र राज्य ,मा.आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विवीध उपक्रमांनी नुकताच साजरा. इयत्ता दहावी- बारावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार, वृक्षारोपण, वसतिगृहातील विद्यार्थांना बुक-पेन वाटप, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला कुंडीभेट.
– उबाठा युवा सेनेचा पुढाकार.
राजुरा १३ जुन  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.आमदार, युवासेना प्रमूख, शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. आमदार युवासेना सचिव श्री. वरूनजी सरदेसाई याच्या आदेशाने व शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्रभाऊ शिंदे,युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांतभाऊ सहारे याच्या मार्गदर्शनत  राजुरा तालुका युवा सेनेतर्फे विवीध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता दहावी – बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसतिगृहातील विद्यार्थांना बुक – पेन वाटप करण्यात आले. रामपुर येथे वृक्षारोपण करण्यात आले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेला पस्तीस कुंड्या भेट देण्यात आल्या. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी नितीन पिपरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, राजुरा विधानसभा,संदीप वैरागडे शिवसेना तालुका प्रमुख राजुरा , प्रदीप येनूरकर शिवसेना शहर प्रमुख, राजुरा, कुणाल निळकंठ कुडे, उपजिल्हा प्रमुख युवासेना राजुरा विधानसभा,  बंटी दादाजी मालेकर, युवासेना तालुका प्रमुख,राजुरा, प्रवीण रमेश पेटकर, युवासेना तालुका चिटणीस, रमेश झाडे, उपतालुका प्रमुख शिवसेना राजुरा, बबलू चौहान, अतुल खनके,ग्रामपंचायत सदस्य,रामपूर,युवासेना विभाग प्रमुख आर्वी-रामपूर, गणेश चोथले, उपतालुका प्रमुख युवासेना आर्वी-रामपूर, रमेश कमटम, माजी उपतालुका प्रमुख शिवसेना,माजी उपसरपंच ग्रा.प.धोपटाळा, निखिल गिरी, अक्षय लांडे, श्रावण गोरे, ओम वांढरे, हर्षल निमकर, मनीष लांडे, ऋतिक काळे, श्रीनाथ बोल्लूरवर, युवासेना उपशहर प्रमुख राजुरा, गौरव चन्ने ,युवासेना शहर विभाग प्रमुख राजुरा, बबलू डाखरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे बादल बेले, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसतिगृह तर्फे विध्यर्थिनी तसेच मोहनदास मेश्राम, लोमेश मडावी, नरेश नुगुरवार , रामपुर ग्राम पंचायत चे वृक्षारोपण करीता सहकार्य लाभले.

COMMENTS

You cannot copy content of this page