गौतम नगरी चौफेर (नागपूर – संजीव भांबोरे) – एकच लक्ष्य रिपब्लिकन ऐक्य रिपब्लिकन ऐक्य या मागणीला धरून संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेशच्या वतीने रिपब्लिकन पक्ष स्थापना दिनानिमित्त संविधान चौक नागपूर येथे आज 3 ऑक्टोबर 2024 ला विशाल धरणे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या धरणे आंदोलनातन कार्यक्रमात विविध गटात विभागलेल्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन आंबेडकरी जनतेच्या मतांचे विभाजन टाळावे लोकशाही गणतंत्र बळकट करावे याकरिता प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. समजा नेते एकत्र येत नसेल तर जनता त्याची जागा दाखवेल असे सुद्धा प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले . यावेळी प्राध्यापक सुरेश खोब्रागडे, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, रोशन जांभुळकर, सुजाताई डॉक्टर, आनंदराव खोब्रागडे, आशित बागडे, उत्तम सहारे, रमेश पाटील, महादेव गोडबोले, प्रकाश कुंभे, शेषराव गणवीर, रमेश फुले, प्रदीप बोरकर, प्राध्यापक प्रदीप बोरकर, ईश्वरजी सूर्यवंशी, ईश्वर सूर्यवंशी, संपतराव वंजारी, दिनेश गोडघाटे, सूर्यभान शेंडे, धनराज खोब्रागडे, सुधाताई जनबंधू, रेखाताई रामटेके, रेश्मा भोयर , रेखाताई रामटेके ,लताताई तिरपुडे ,यांनी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे संचालन बाळूमामा कसमकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास पाटील तर आभार प्रकाश कुंभे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दिलीप वानखडे, ज्ञानचंद जांभूळकर, विजय भोवते, संजीव भांबोरे, आय एल नंदागवळी शिवदास गजभिये, राजेश मडामे, रमेश गेडाम पॅंतरण अनिलमेश्राम राजा बनसोड, राज्य सुखदेवे, मनोहर गायकवाड, दीपक डोंगरे हंसराज मेश्राम, दिनेश डोके, शेखर पाटील, चरणदास जनबंधू गौतम सातपुडते, सुधाकर टवळे, कृष्णा पाटील, धनराज शेंडे, सुनील इलमक,मनोहर गायकवाड, ऋषी मून, अशोक बागडे, प्रकाश चव्हाण, डॉक्टर विनोद रंगारी, पंजाबराव मेश्राम या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
COMMENTS