– शिबिरार्त्यांच्या आरोग्याची घेतली जाते काळजी.
गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा) – १२ मे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वप्रणाली नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीता प्रणित बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे दि.६ मे ते १६ मे २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या शीबिरार्थ्यांची निःशुल्क आरोग्य सेवा करण्यासाठी डॉ. रितेश ठाकरे यांनी पुढाकार घेत आवश्यक ती आरोग्य सेवा पुरवीत आहे. विवीध वयोगटातील मुल – मुली या शिबिरात प्रशिक्षण घेत असून पहाटे पाच ते रात्रौ दहा वाजेपर्यंत त्यांची दिनचर्या असते. यात वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरीक कसरती सुद्धा शिकविल्या जाात आहे. त्यामुळें शीबिरार्थ्यांची कुठलीही शारीरिक, आरोग्यविषयक अडचणी आल्यास वेळीच योग्य ती आरोग्यसेवा निःशुल्क देऊन या शिबिराला सहकार्य देत आहेत. यावेळी ह. भ.प.स्वामिनी गौरीताई विटोले, मोहनदास मेश्राम, सेवाधिकारी, श्री गुरुदेव सेवा मंडळ, राजुरा, ह.भ.प. शैलेश कावळे महाराज, देविदास वांढरे, उज्वल शेंडे, गजानन घुगुल, प्रकाश उरकुंडे, बादल बेले आदींची उपस्थिती होती. राजुरा शहरात हे शिबिर प्रथमच होत असून या शिबिरात १६० मुल – मुली सहभागी झाले असुन शिबिरातील अभ्यासक्रमात सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, लाठीकाठी, कराटे, दांडपट्टा, मनोरे इत्यादी शारीरिक कसरतीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन होत आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरीता श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने अथक परिश्रम घेतले जात आहे. हे शिबिर निवासी असून शिबिरार्थ्याना वेगवेगळ्या विषयांवर बौद्धिक मार्गदर्शन सुद्धा केल्या जात आहे.





COMMENTS