– गाडीवर बसून मोबाईल वर बोलण्यात व्यस्त वाहतूक पोलिसांचे वाहतूक व्यवस्थेकडे सपशेल दुर्लक्ष.
– थोडक्यात टळली जीवितहानी.
– वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करा. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच माजी विद्यार्थी संघाची मागणी.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा १९ नोव्हेंबर –
दिनांक १८ नोव्हेंबर ला सायंकाळी पाच वाजता नंतर राजुरा येथील आदिफाबाद रेल्वे क्रॉसिंग जवळ भयावह अपघात झाला. दोन्ही दुचाकी समोरासमोर एकमेकांना धडकल्या. यात नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात जीवितहानी टळली. परंतु ही सर्व घटना तेथे उपस्थित असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत घडली. परंतु साधी विचारपूस किंवा कार्यवाही न करताच त्या साहेबांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन आपल्या कर्तव्याकडे नजरा फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सकाळी व सायंकाळी या मार्गावर खूपच वर्दळ असते. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, वनोद्यान, एसटी आगार रेल्वे क्रॉसिंग च्या पलीकडे आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी या मार्गातून ये जा करतात. परंतु सध्या राजुरा शहरात वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून वाहतूक व्यवस्था सांभाळणारे कोणी आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठेही, कधीही अवजळ वाहतूक करणारे मोठमोठे ट्रक, बस, गाड्या या महामार्गावर अवैधरित्या पार्किंग करून उभ्या असतात. त्यावर बोलल्यास वाहतूक पोलिस म्हणतात आम्ही किती गाड्या चालन करू, रस्त्याच्या कडेला गाड्या पार्किंग करतात त्याला आम्ही काय करू. एकप्रकारे हा किळसवाणा प्रकार असून कोणाचा जीव गेल्यावर पोलीस प्रशासन जागे होणार आहे काय. असा संतप्त सवाल बादल बेले यांनी उपस्थित केलाय. गाडीवर बसून मोबाईल वर बोलत बसणाऱ्या त्या वाहतूक पोलिसावर कार्यवाही झाली पाहिजे, अवैध पार्किंग करणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक व शक्य असल्यास फौजदारी कारवाई करावी, विद्यार्थी, सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याकडे पोलिस विभागाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच माजी विद्यार्थी संघाचे सचिव बादल बेले यांनी केली आहे. एखाद्याचा जीव जाऊ नये म्हणून कर्तव्य बजावणारे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणारे काही पोलिस कर्मचारी असतात तर दुसरीकडे चालढकल करीत स्वतःच्या कर्तव्यापेक्षा गाडी, मोबाईल, गप्पागोष्टी करण्यात तल्लीन राहून अपघात होऊ नये किंवा झालेल्या अपघाताकडे दुर्लक्ष करणारे वाहतूक पोलिसांच्या भूमिकेने सामान्य नागरिकांचा मात्र जीव वेशीला लागलाय.


COMMENTS