लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती कुंभेजरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती कुंभेजरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न

गौतम नगरी चौफेर चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.

जिवती– तालुक्यातील कुंबेझरी या गावी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून भव्य प्रतिमेची रॅली काढण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे जेसीबीने फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. सकाळी नऊ वाजता अण्णाभाऊ साठे चौकात ध्वजारोहण श्री रोहिदास तोगरे तुकाराम वाघमारे, बापूराव बसवंते दिगंबर जेवाले, नागेश देवाले, पंढरी घोसे, मारुती पट्टेवाले, किसन गोतावळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. शरदजी गायकवाड ज्येष्ठ साहित्यिक लेखक विचारवंत कोल्हापूर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे राज्य समन्वयक प्रमुख उपस्थिती श्री संजय भाऊ कटाळे नागपूर श्री राजीव येले चंद्रपूर श्री मून साहेब चंद्रपूर श्री पंढरी सूर्यवंशी, अरविंद कलवले. मेजर वाघमारे,श्री नबिलास भगत सर श्री प्रवीण जाधव ठाणेदार इंजि. संतोष मोतीवाड, वृक्षप्रेमी प्रभू बसवंते यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. सुग्रीव गोतावळे, व्यंकटी तोगरे सर देविदास कांबळे, विजयकुमार कांबळे, श्री विजय गोतावळे, श्री घोडके सर, पंढरी गायकवाड, मोरे, भालेराव, सोपान शिकारे, दत्ता गायकवाड, दत्ता तोगरे, श्री केदासे, श्री मोतेवाड, शाहीर बालाजी वाघमारे श्री कराळे सर, अनिता गोतावळे सौ जयश्री गोतावळे श्रीमती जयाबाई नामवाड सौ गायकवाड मॅडम श्री डुकरे सर श्री पवार सर श्री प्रेम राठोड संतोष गोतावळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले तर उद्घाटनीय भाषणात डॉ. शरद गायकवाड साहेब म्हणाले की, शोषणमुक्त समाजासाठी अण्णाभाऊंनी जे कार्य केले ते जगाच्या पाठीवर  सुवर्ण अक्षराने लिहिलेले आहे हे समाजाने लक्षात ठेवून अण्णाभाऊंच्या विचारांचा बाबासाहेबांच्या प्रेरणेचा भाग बनवून प्रगती केली. तरच समाजात बदल होऊ शकतो त्यासाठी सर्वांनी शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. व देशातील परिस्थिती गंभीर असून पोटात एक आणि ओठात एक असा यांचा डाव आहे. आणि संविधान बदलविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बहुजन समाजाने आता जागृत होणे गरजेचे आहे. असे परखड मत त्यांनी मांडले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अंकुश गोतावळे यांनी समाजाच्या महापुरुषाबरोबरच आपल्या जुन्या पूर्वजांनी शिकवलेले संस्कार व शिक्षणाची जोड घालून पुढे गेल्यास समाजात प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. असे अनेक दाखले त्यांनी दिलेले आहेत या कार्यक्रमात शाहीर भुजंग बसवंते, शाहीर तुकाराम जाधव यांनी अण्णाभाऊ वरील गीत गाऊन लोकांच्या मनात चैतन्य फुलवले. अनेक लहान मुलांनी अण्णाभाऊ चे विचार सांगण्याचे प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री भानुदास जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री दीपक गोतावळे यांनी केले तर आभार डॉ. पांडुरंग भालेराव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लहुजी गोतावळे,अनिल बसवंते, चंद्रकांत वाघमारे, शेखर पट्टेवाले, रमाकांत कांबळे, विष्णू अंपल्ले, सूर्यकांत कांबळे, श्रीनिवास वाघमारे, धनराज घोडके, बाळू गायकवाड, नागेश नामपल्ले, आनंद तोगरे, अजित गायकवाड, सौरभ कांबळे, ज्ञानेश्वर वाघमारे, उद्धव गोतावळे,संजय,भालेराव, जयंत गोतावळे, भगवान कांबळे, धर्मा गोतावळे, राजू दूधमोगरे, रवी जेवाले संतोष भालेराव, सतीश गोतावळे विष्णू भालेराव श्रावण गोतावळे, संतोष शिकारे व लहुजी ब्रिगेड महिला मंडळ व गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.

COMMENTS

You cannot copy content of this page