पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान तात्काळ पंचनामे करून मदत करण्यात यावी

HomeNewsअमरावती डिवीजन

पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतोनात नुकसान तात्काळ पंचनामे करून मदत करण्यात यावी

गौतम नगरी चौफेर (प्रतिनिधी, खुशाल जाधव, यवतमाऴ जिल्हा) – आर्णी : तालुक्यातील बारभाई व चिंचबर्डी  महसुली क्षेत्र शेत शिवारात१ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर दरम्यान  ढगफुटी सदृश्य पावसाच्या कहरने शेतमालाचे आतोनात नुकसान झाले असुन महसूली मंडळ यांनी त्वरीत पंचनामे करुण येथील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावे असे निवेदन ग्रामस्थांनी आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहूर वाघ यांना दिले. येथील शेतशिवारातून वाहत असलेल्या मोठ्या व लहान नाल्यांना पूर आल्याने शेती पूर्णत खरडून गेली. शेतात पाणी शिरल्याने कापूस तूर सोयाबीन व इतर पिक उध्वस्त झाले ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे शेतमालांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यापुढे जगावे कि मरावे असा प्रश्न उभा आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने शेती पिकाचे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या वर्षी आतापर्यंत शेतमालाला पोषक असा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेती चांगलीच बहरून आली होती. परंतु दि. १ सप्टेंबर ३ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे होत्याचे नव्हते झाले, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गरुपी संकटाने हिराहून घेतल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यामुळे अशा संकटातून सावरण्यासाठी शासनाने एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदनातून दिली आहे यावेळी उपस्थित बळीराम चव्हाण बंडू जाधव  अविनाश राठोड तारासिंग चव्हाण प्रवीण चव्हाण महेंद्र राठोड रेणुराव जाधव प्रेम राठोड नरसिंग राठोड सुभाष जाधव नरेंद्र राठोड मामराज राठोड तुकाराम राठोड यांनी दिले आहे.

COMMENTS