गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे ) – आवाळपूर येथे राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा आजपासून॰:आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ आवाळपूर, दत्त मंदिर समिती आवाळपूर, गुरुदेव सेवा मंडळ राजुरा, जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आवाळपूर तथा समस्त आवाळपूर ग्रामवासीयांच्या वतीने १७ जानेवारीपासून तीन दिवस प्रभाकर मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवाप्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात प्रामुख्याने ग्राम स्वच्छता अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम, समाज प्रबोधनात्मक कीर्तन, सामूहिक प्रार्थना व राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी प्रबोधनकार डॉ. रामपाल महाराज धारकर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय भव्य खंजिरी स्पर्धेसाठी महिला व पुरुष असे दोन गट आहे. दोन्ही गटामध्ये भरगच्च असे पारितोषिकेही आयोजकाने जाहीर केले आहे. यात पुरुष व महिला गटामध्ये प्रथम सहा अशा मंडळास बक्षिसे देण्यात येईल. वैयक्तिक पुरुष व महिला गटामध्ये विशेष पुरस्कार म्हणून उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट खंजिरी, हार्मोनियम, तबला व पोशाख आदीसाठी बक्षिसे जाहीर केली आहे. या कार्यक्रमाच्या मेजवानीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.







COMMENTS