शहराच्या विकासासाठी विविध सामाजिक संघटनांचा “मागणीनामा”.

HomeNewsनागपुर डिवीजन

शहराच्या विकासासाठी विविध सामाजिक संघटनांचा “मागणीनामा”.

– सर्व पक्षीय नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवार असलेल्यांना दिला मागणीनामा.
– उमेदवाराच्या जाहीरनाम्यांकडे सामाजिक संघटनांचे लक्ष.

गौतम नगरी चौफेर सुवर्णा बादल बेले राजुरा – २३ नोव्हेंबर  गाव ते देश पातळीवर विकासाच्या प्रत्येक बाबींमधे आपला वाटा देऊन कर्तव्य बजावणाऱ्या सामाजिक संघटना असतात. चुकीच्या निर्णयाचे लोकशाही मार्गाने विरोध करून तर चांगले आणि योग्य निर्णय असतील तर त्यात प्रत्यक्ष आपला सहभाग दर्शवत साथ देणाऱ्या सामाजिक संघटना या संपूर्ण गाव ते देश पातळीवर कार्यरत असतात. राजुरा शहरातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवार असलेल्या सर्व पक्षीय उमेदवारांना शहरातील काही समस्या, विकासाचे मुद्दे, स्वच्छ व सुंदर शहर निर्मितीकरिता आवश्यक असणाऱ्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन मागणीनामा निवेदन तयार केले. हे निवेदन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राधेश्याम अडानीया भारतीय जनता पक्ष, अरुण धोटे काँग्रेस -शेतकरी संघटना -आरपीआय समर्थित नगर विकास आघाडी, राजेंद्र डोहे शिवसेना (शिंदे गट), आदित्य भाके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांना प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बादल बेले, सृजन नागरिक मंच चे मिलिंद गड्डमवार, गुरुदेव सेवा मंडळाचे मारोती सातपुते, जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुद्देशीय संस्थेचे रतन पचारे, माजी विद्यार्थी संघाचे अविनाश दोरखंडे, छावा फाउंडेशन चे आशीष करमरकर, आझाद फाऊंडेशनचे आसिफ सय्यद, तसेच मनोज तेलीवार, बबलू चव्हाण, आकाश वाटेकर , विलास कुंदोजवार, प्रणिता मांडवकर, मनोज कोल्हापुरे, रोहित बताशंकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

1. फोटो:- भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाकरीता उभे असलेले राधेश्याम अडानिया यांना मागणीनामा निवेदन देताना सामाजिक संस्थांचे पदाधिकारी …..
फोटो 2. काँग्रेस -शेतकरी संघटना -आरपीआय समर्थित नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाकरीता उभे असलेले अरुण धोटे यांना मागणीनामा निवेदन देताना सामाजिक संस्थांचे पदाधिकारी…..
फोटो 3. शिवसेना (एकनाथ शिंदे गटाचे) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र विठ्ठलराव डोहे यांना मागणीनामा निवेदन देताना सामाजिक संस्थांचे पदाधिकारी……

———————————————
एकूण अठरा मुद्द्यांचा मागणीनामा असून त्यात शहराच्या विकासाकरीता व नागरिकांच्या समस्या सोडवणुकीकरिता सर्वांगीण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने शहरातील स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता तक्रार निवारण सारख्या आवश्यक बाबी, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, वर्षा जलसंचयन, शोष खड्डा, शहराचे सौंदरीकरण, निर्माल्य संकलन, प्राचीन वारसा वृक्ष नियोजन, वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण आदींसह अनेक मुद्दे समाविष्ट आहे.

फोटो 4. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाचे) नगराध्यक्ष पदाकरीता उभे असलेले आदित्य भाके यांना मागणीनामा निवेदन देताना सामाजिक संस्थांचे पदाधिकारी…..

———————————————
सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. मतदाना संदर्भात जनजागृती करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहनही यावेळी विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.
———————————————

COMMENTS

You cannot copy content of this page