गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा –तालुक्यातील गराडा बुजरूक येथे पंचशील बौद्ध विहार समिती गराडा बुजरूक तर्फे संकेत पतिरामजी हुमणे यांची महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल दिलिपजी ढगे बाबुजी, दुर्योधन हुमणे, यांच्या हस्ते 19 सप्टेंबर ला सत्कार करण्यात आले. संकेत हुमणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज या महापुरुषांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून गावातील युवक युवतींनी प्रशासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व संयमाने पुढे जावे व माझ्याप्रमाणे यश गाठले तर मला अत्यानंद होईल असे मत व्यक्त केले. यावेळी सत्काराचे प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मंगला चव्हाण, परसरामजी देशमुख, प्रभुजी चव्हाण, कपूर चव्हाण, विक्की मेश्राम, समीर मेश्राम, सुहास जांभुळकर, श्रीमती मालताबाई चव्हाण, श्रीमती भाऊराव गाढवे, सौरभ गाढवे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज चव्हाण यांनी केले, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आभार जितेंद्र मेश्राम यांनी मांडले या कार्यक्रमाला गावातील युवक युवती इतर मंडळी उपस्थित होते.


COMMENTS