राजुरा आगारा तर्फे आदर्श शाळेतील विद्यार्थांना मोफत बस पास वितरण.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा आगारा तर्फे आदर्श शाळेतील विद्यार्थांना मोफत बस पास वितरण.

– विद्यार्थांना शाळेतच मिळाले एसटी बस पासेस.

गौतम नगरी चौफेर // राजुरा २८ जुन बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे प्रथमच राज्य परिवहन महामंडळाचे एसटी बसचे मोफत पास शाळेतूनच वितरीत करण्यात आले. यावेळी राकेश बोधे, आगार व्यवस्थापक राजुरा, एस. जी. लाडसे, वाहतूक निरीक्षक, कुलदीप दुबे, लिपिक, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा, सारीपुत्र जांभूळकर,मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, रूपेश चिडे, स्काऊट मास्तर, सहाय्यक शिक्षक विकास बावणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सत्र २०२५-२६ पासून महाराष्ट्र राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांना पासेस करीता त्रास होऊ नये, रांगेत तात्काळत उभे राहून वेळ वाया जावू नये याकरिता बसस्थानक कार्यालय, आगार याठिकाणी न जाता शाळेतच मोफत बस पास देण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकाना देण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्याना पासेस वितरित करण्यात आले. आदर्श हायस्कूल चे तिस व आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर चे अठ्ठावीस विद्यार्थांना बस पास वितरित करण्यात आले. त्यामुळें विद्यार्थांनी व शिक्षकांनी राज्य शासनाचे, राज्य परिवहन महामंडळाचे व राजुरा आगार व्यवस्थापक यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये अतीशय आनंदाचे वातावरण असून शाळेतून पासेस मिळाल्याने पालकांनी ही समाधान व्यक्त केले.

COMMENTS

You cannot copy content of this page