सभेतून बोलण्यापेक्षा कार्यकर्त्याचे काम बोलले पाहिजे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

HomeNewsनागपुर डिवीजन

सभेतून बोलण्यापेक्षा कार्यकर्त्याचे काम बोलले पाहिजे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी मुंबई) दि. 9 –  स्टेजवर भाषण करुन बोलण्यापेक्षा कार्यकर्त्यांने आपल्या भागात प्रत्यक्ष कामे करावी. चांगल्या कामाच्या बळावर लोकांची मने जिंकावी. लोकांना मदत करुन चांगले कार्य, कर्तृत्व घडवावे. लोकांचे निस्वार्थ कामे करावी. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाषण जरुर करावे, मात्र त्यासोबत कार्यकर्त्याचे काम बोलले पाहिजे. दिवंगत अंकुश गायकवाड हे सभेत भाषण करुन बोलत नव्हते मात्र त्यांनी अनेकांना केलेली मदत, केलेले कार्य कर्तृत्व त्यांनी केलेले काम आजही त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगत आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाचे डोंबीवली शहर अध्यक्ष दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या जाहीर श्रध्दांजली सभेत ना. रामदास आठवले बोलत होते. 

डोंबीवलीतील मोठा गांव रेतीबंदर येथे रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दिवंगत अंकुश गायकवाड यांची जाहीर श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली होती. दिवंगत अंकुश गायकवाड हे प्रामाणिक, निष्ठावंत, क्रियाशील, कर्तबगार कार्यकर्ते होते. राजकारणात राहुनही राजकारण न करणारा प्रामाणिक, सरळमार्गी राजकीय कार्यकर्ता दिवंगत अंकुश गायकवाड होते. अनेक अडल्या नडलेल्यांना मदत करणारे अंकुश गायकवाड दानशुर व्यक्तीमत्व होते. त्यांच्या स्मृती जोपण्यासाठी डेंबीवलीतील एखाद्या रस्त्यात किंवा चौकास दिवंगत अंकुश गायकवाड यांचे नाव देण्यात यावे अशी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीन कल्याण डोंबीवली महानगरपालिकेस मागणी करीत आहोत. असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.
दिवंगत अंकुश गायकवाड यांचे दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी हदयविकाराने वयाच्या 62 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली आहे. आंबेडकरी चळवळीचे समाजसेवक दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या स्मृती जोपासण्यासाठी कल्याण डोंबीवली महानगरपालिकेने डोंबीवलीतील एका चौकास दिवंगत अंकुश गायकवाडांचे नाव द्यावे यासाठी आपण महापालिकेला पत्र देणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मान्यंवर, कार्यकर्ते  मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS