गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा) – प्रा .डॉ सुरेश खोब्रागडे यांच्या चार पुस्तकाचे प्रकाशन सोहळा साजरा करण्यात आला त्यामध्ये वासल्याची विद्यापीठ रमाई, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध राजा सम्राट हर्षवर्धन आणि भारताचे राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम अशा चार पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा कार्यक्रम लाखनी येथील महाप्रज्ञ बुद्ध विहार येथे करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान बचाव संघर्ष समिती भंडाऱ्याचे अध्यक्ष रोशन जांभुळकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून व ज्याच्या हस्ते पुस्तकाच्या प्रकाशन झाले असे सुप्रसिद्धी साहित्यिक भगवान सुखदेवे,गोंदियाचे सुप्रसिद्ध साहित्य िक प्राध्यापक युवराज गंगाराम, त्याचप्रसंगी या सुप्रसिद्ध साहित्यिक लाखनीच्या सी एम बागडे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र भूषण डी जी रंगारी ,सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर धनंजय भिमटे, साहित्यिक प्रल्हाद सोनवणे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड , नाजूकराम बनकर, सुप्रसिद्ध साहित्यिक बापू इलमकार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला यामध्ये सर्व मान्यवरांना याप्रसंगी सर्व मान्यवरांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांना स्मृतीचिन्ह पुस्तक भेट देऊन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी सहितिक भगवान सुखदेवे यांनी साहित्याची काय गरज आहे व या साहित्यामुळे आंबेडकर चळवळ जिवंत कशी राहिलेली आहे आणि डॉ सुरेश खोबराकडे हे विदर्भभूषण आहेत असे त्यांनी गौरव केला त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक युवराज गंगाराम सामाजिक कार्यकर्ते विचारवंत अमृत बनसोड , प्रल्हाद सोनवणे, रामेश्वर भिसेन ,डॉक्टर नाजुक राम बनकर, महाराष्ट्र भूषण व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांचेही भाषणे व डॉक्टर प्राध्यापक सुरेश खोब्रागडे यांचे जीवन कार्य व ते साहित्य क्षेत्रात कशी काय प्रगती केली याविषयी त्यांच्या गुणगौरव करण्यात आला त्यांच्याच प्रमाणे त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षे लग्न पर्यायाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या सुद्धा पत्नीसहित सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सायंकाळी विशेष संगीतमय कार्यक्रम कविवर्य वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा संगीतमय नजराणा गायक डॉक्टर सिद्धार्थ रंगारी, आकाश भाईसारे यांनी सादर केले कार्यक्रमाचे अतिशय उत्तम सूत्रसंचालन डॉ रेवाराम खोब्रागडे यांनी केले प्रास्ताविक सुमन कानेकर तर आभार प्राध्यापक डॉक्टर युवराज खोब्रागडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गजेंद्र गजभिये, नामदेव कानेक,र प्राध्यापक युवराज खोब्रागडे, अश्विनी भिवगडे, उपेंद्र देशपांडे, दीपक खोब्रागडे, विना डोंगरे, साधना शिंगाडे, कमला गणवीर, शर्मिला खंडारे ,रवी रामटेके, पंकज खांडेकर ,नलिनी ढोरे, यांनी अतिशय परिश्रम केले व शेवटी भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS