आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन.
गौतम नगरी चौफेर //नांदाफाटा /कोरपना :- मागील अनेक वर्षापासून पालगाव वासियांना सुलभ रस्त्या नसल्याकारणाने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हीच मागणी घेऊन 5 मे ला अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर च्या नांदा येथील प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले होते परंतु कंपनी प्रशासन जुमानत नसल्याने पुन्हा एकदा आज पाल गावाची आक्रमक होऊन अल्ट्राटेक कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलनात बसले आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पालगाव वासियांना रस्त्या नसल्याने नरक यातना भोगाव लागत आहे. यासाठी मागील अडीच ते तीन वर्षात पारगाव वासियांनी अनेकदा कंपनी प्रशासनाला पत्र दिले व आंदोलने सुद्धा केली. रस्त्या संदर्भात चर्चा सुद्धा करण्यात आली मात्र कंपनी वेळ मारून नेत असल्याने तसेच वेळोवेळी ग्रामवासी यांचा अपमान करीत असल्याने ०५ मे ला राजूरा विधानसभाचे आमदार देवराव भोंगळे व व पालगावचे सरपंच अरुण रागीट यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. स्वतः आमदार आंदोलन स्थळी ग्रामवासियांसोबत उपस्थित राहून आंदोलन केले अखेर तीन दिवसानंतर कंपनी प्रशासन नरमले व लिखित स्वरूपात 30 मे ला अल्ट्राटेक ते पालगाव असा रस्ता तयार करण्याचे लिखित पत्र दिले. मात्र जून महिना संपत आला तरी कामाला सुरुवात झाली नसल्याने संतप्त ग्रामवासीयांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या नेतृत्वात पुनश्च अल्ट्राटेक कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले.

विशेष म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या दत्तक गावामध्ये पालगाव या गावाचा समावेश असून लगतच कंपनीची खान सुद्धा आहे.
(अल्ट्राटेक मॅनेजमेंटने आम्हाला पालगाव ते माईन्स पर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता करून घेण्याचा मान्य केलं होतं सोबतच कामगारांच्या समस्या सुद्धा सोडवण्यासाठी लिखित पत्र दिले होते. कंपनी मात्र एकदा मीटिंगसाठी आली मीटिंगमध्ये पुन्हा उडवायची उत्तर पुन्हा वेळ मारून नेला आम्ही रस्ता बनवून देऊ मुंबईला प्रस्ताव पाठवला परंतु दुर्दैवाने अल्ट्राटेक मॅनेजमेंटनी कोणती कारवाई केली नाही. महाराष्ट्रामध्ये एकमेव घटना असेल एखाद्या लोकप्रतिनिधीला कंपनीने आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्यांदा या ठिकाणी आंदोलनाला बसाव लागत आहे ही मात्र अत्यंत खेदाची बाब आहे. आमदार देवराव भोंगळे राजुरा विधानसभा क्षेत्र)



COMMENTS