• जाती धर्माच्या नावावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलणारा या देशात जन्माला आलेला नाही.
गौतम नगरी चौफेर (शिला धोटे) – राज्यात किमान १० ते १२ जागा आणि विदर्भात तीन जागा रिपाईसाठी सोडाव्यात अशी आग्रही मागणी महायुतीच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षासाठी सोडावी अशी मागणी महायुतीच्या नेत्यांकडे करण्यात आल्याची माहिती रिपाई नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन रविवार (ता. २२) करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले शहरात आले. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील सर्वच घटक पक्ष कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी चांगले काम केले. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात
मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. संविधानाचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे. संविधानाचा रामदास आठवले सन्मान करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जाती, 👌धर्माच्या नावावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलणारा या देशात जन्माला आलेला नाही. जाती धर्माच्या नावावर भारतात पाकिस्तान सारखी फाळणी कधीच होणार नाही. आज देशात जातीय व धार्मिक वातावरण दिसत असले तरी समानता मोठ्या प्रमाणात आली आहे. परिस्थिती बरीचशी बदलली आहे. सामाजिक समतेच्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र
कॅटेगिरीतून आरक्षण द्यावे. मनोज जरांगे ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आहे. मात्र, ओबीसींमधून आरक्षण न देता यातून मार्ग काढावा, असेही आठवले म्हणाले. २५ ऑक्टोबरपासून राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही समोर जात आहे.
COMMENTS