पेदाआसापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले

HomeNewsनागपुर डिवीजन

पेदाआसापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले

गौतम नगरी चौफेर प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती –चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जिवंती अंतर्गत दिनांक 20/08/2025 रोजी वार बुधवार ला.मा. पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर व अप्पर पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशन जिवती अंतर्गत मोजा पेद्दाआसापूर येथे एकूण 250 झाडे लावण्यात आली व सदर झाडाची सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने गावातील लोकांना सदर झाडे दत्तक देण्यात आली. सदर वृक्षारोपण कार्यक्रमात करिता पोलीस स्टेशन जिवती येथील ठाणेदार प्रवीण जी जाधव. Psi पोले सा,psi रहाटे सा. व पोलीस स्टेशन जिवती येथील एकूण आठ पोलिस अमलदार व महिला पोलीस अमलदार हजर  होते. तसेच पैदासापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदामभाऊ राठोड, नाईक व्यंकटी पवार, कारभारी किसन जाधव, माजी सरपंच उत्तम राठोड, जी. प. शाळा पेदा आसापूर चे मुख्याध्यापक विशाल सोन्नर सर, हिरामण राठोड, रामेश पवार, गोविंद पवार, गणेश राठोड, गजानन चव्हाण व गावातील 60 ते 70 स्त्री पुरुष उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page